नागझरी शिवारात वरली मटका जुगार अड्डा; ‘एलसीबी’ने सहा जणांना पकडले, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्‍त

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः अवैधरित्या सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) छापा मारला. या कारवाईत 2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज, 29 मे रोजी सायंकाळी हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नागझरी शेत शिवारात (ता. खामगाव) करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीने …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः अवैधरित्या सुरू असलेल्या वरली मटका जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्‍थानिक गुन्‍हे शाखेने (एलसीबी) छापा मारला. या कारवाईत 2 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करत 6 जणांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज, 29 मे रोजी सायंकाळी हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील नागझरी शेत शिवारात (ता. खामगाव) करण्यात आली.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्‍या आधारे एलसीबीने छापा मारला. आरोपींकडून नगदी 16 हजार रुपये, 7 मोबाइल, 4 मोटारसायकल असा एकूण 2, 56, 585 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरिक्षक विजय मोरे, पोलीस उपनिरिक्षक नीलेश शेळके, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप आढाव, पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ सय्यद हारुन, पोहेकाँ विलास काकड, पोकाँ नदीम शेख, पोकाँ युवराज शिंदे, पोकाँ रवी भिसे यांनी पार पाडली.