नातवाला भेटायला चालले होते… भेट होण्याआधीच घडली ती घटना!

मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विहिरीत पडून 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घाटनांद्राजवळ (ता. मेहकर) काल, 11 जानेवारीला सकाळी 9 च्या सुमारास समोर आली. हरिभाऊ लक्ष्मण राठोड (रा. पाथर्डी, ता. मेहकर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते नातवाला भेटण्यासाठी रात्री घाटनांद्रा येथे येत असताना सरकारी विहिरीत पडले. रात्र असल्याने कोणालाच …
 

मेहकर (अनिल मंजुळकर : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : विहिरीत पडून 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घाटनांद्राजवळ (ता. मेहकर) काल, 11 जानेवारीला सकाळी 9 च्या सुमारास समोर आली.

हरिभाऊ लक्ष्मण राठोड (रा. पाथर्डी, ता. मेहकर) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. ते नातवाला भेटण्यासाठी रात्री घाटनांद्रा येथे येत असताना सरकारी विहिरीत पडले. रात्र असल्याने कोणालाच समजले नाही. गजानन हरिभाऊ राठोड यांनी सकाळी जानेफळ पोलीस ठाण्याला माहिती  दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तपास ठाणेदार श्री. मसराम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. काकडे, जमादार शरद बाठे करत आहेत.