नातीवर बलात्कार करणारा आजोबा भोगणार आता कर्माची फळे; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकाच्या शेतात नेऊन ८ वर्षीय चिमुकल्या नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने ३० ऑगस्ट रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दीड वर्षापूर्वी चिखली तालुक्यातील कव्हळा येथे ही घटना घडली होती. गजानन ज्ञानबा मोरे (५०, रा. कव्हळा, ता. चिखली) असे आरोपीचे नाव आहे. ७ मार्च २०२० रोजी कव्हळा …
 
नातीवर बलात्कार करणारा आजोबा भोगणार आता कर्माची फळे; न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मकाच्या शेतात नेऊन ८ वर्षीय चिमुकल्या नातीवर बलात्कार करणाऱ्या नराधम आजोबाला विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने ३० ऑगस्ट रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दीड वर्षापूर्वी चिखली तालुक्यातील कव्हळा येथे ही घटना घडली होती.

गजानन ज्ञानबा मोरे (५०, रा. कव्हळा, ता. चिखली) असे आरोपीचे नाव आहे. ७ मार्च २०२० रोजी कव्हळा येथील दत्तात्रय जपे यांच्या शेतात पीडित मुलीची आई मजुरीसाठी गेली होती. त्याच वेळी तिचा आजोबा गजाननसुद्धा त्याच शेतात मजुरी कामासाठी आला होता. आई शेतात मजुरी करत असताना पीडित चिमुकली कोठ्याजवळ खेळत होती. त्यावेळी तिचा आजोबा तिच्याजवळ आला. पाईप उचलण्यासाठी चल असे म्हणत तिला शेजारच्या मकाच्या शेतात नेले. मकाच्या शेतात आजोबाने नातीवर बलात्कार केला होता. घडलेली घटना कुणाला सांगू नको असे म्हणत घरी गेल्यावर २० रुपये देण्याचे अामिष दाखवले होते. संध्याकाळी घरी गेल्यानंतर मुलीला वेदना होऊ लागल्या.

तिच्या आई- वडिलांना तिने संपूर्ण हकीकत सांगितली. ९ मार्च २०२० रोजी पीडितेच्या आईने अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक केली होती. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. आशिष केसाळे यांनी काम पाहिले. सरकारी पक्षाने एकूण ९ साक्षीदार तपासले. यात पीडिता, तिची आई हिच्यासह सर्वांच्याच साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूचा युक्तिवाद एेकूण घेत विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी आजोबाला २० वर्षे कठोर कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी एका महिन्याची साध्या कैदेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात अमडापूर पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय सोनवणे व कोर्ट पैरवी पोहेकाँ संजय ताठे यांची भूमिका महत्त्वाची ठरली.