नातेवाइकांनी पाठ फिरवली, पण समाजाचे भान जागले!; देऊळगाव राजात अखेर त्या महिलेवर अंत्यसंस्कार

देऊळगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळनेर (ता. देऊळगा राजा) येथील 50 वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराला तिचे नातेवाइक आले नाहीत. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार करवले. यासाठी पालिका कर्मचार्यांचेही सहकार्य लाभले. सूत्रांच्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने 50 वर्षीय शोभाबाई प्रभू राठोड यांचे 12 जानेवारीला निधन झाले. त्यांना तीन तरुणांनी देऊळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. डॉ. वैशाली …
 

देऊळगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पिंपळनेर (ता. देऊळगा राजा) येथील 50 वर्षीय महिलेच्या अंत्यसंस्काराला तिचे नातेवाइक आले नाहीत. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत अंत्यसंस्कार करवले. यासाठी पालिका कर्मचार्‍यांचेही सहकार्य लाभले.

सूत्रांच्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने 50 वर्षीय शोभाबाई प्रभू राठोड यांचे 12 जानेवारीला निधन झाले. त्यांना तीन तरुणांनी देऊळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. डॉ. वैशाली मांटे यांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. मात्र या महिलेचे कुणीच नातेवाइक नसल्याने मृतदेह कुणाच्या ताब्यात द्यायचा असा प्रश्‍न निर्माण झाला. ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्यांना ही माहिती कळताच महाद्वार चौक मित्रमंडळाचे मल्हार वाजपे, गजानन धावणे, लखन कुंटे, सुरज गुप्ता यांनी रुग्णालयात धाव घेऊन पोलीस प्रशासनाच्या साह्याने अंत्यसंस्कारासाठी हालचाली सुरू केल्या. ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ केशव मुळे, पोलीस नाईक तुळशीराम गुंजकर, विजय गिते, महिला पोलीस कर्मचारी शीतल नांदे व पालिका कर्मचार्‍यांच्या मदतीने अंत्यसंस्कार केले.