नाते विसरून घडवताहेत रक्‍तपात…. असे कसे तुम्‍ही जवळचे नातेवाइक?; खामगाव तालुक्‍यातील घटना

नांदुरा ( प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेती आणि क्षुल्लक कारणावरून रक्ताचे नातेच कसे रक्तपात घडवते, याचा प्रत्यय खामगाव तालुक्यातील घटनेतून आला आहे. आत्येभावानेच शेतीच्या वादातून काठीने हल्ला करून शेतकऱ्याला जखमी केले. ही घटना खामगाव तालुक्यातील घाणेगाव येथे 19 फेब्रुवारीच्या दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगेश …
 

नांदुरा ( प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः शेती आणि क्षुल्लक कारणावरून रक्‍ताचे नातेच कसे रक्‍तपात घडवते, याचा प्रत्‍यय खामगाव तालुक्‍यातील घटनेतून आला आहे. आत्‍येभावानेच शेतीच्‍या वादातून काठीने हल्ला करून शेतकऱ्याला जखमी केले. ही घटना खामगाव तालुक्‍यातील घाणेगाव येथे 19 फेब्रुवारीच्‍या दुपारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी पिंपळगाव राजा पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला आहे.

मंगेश निवृत्ती वाघमारे (31, रा. घाणेगाव) आणि त्‍याच्‍या काकाची शेती शेजारी शेजारी आहे. काकाची शेती त्‍याचा आत्‍येभाऊ गजानन महादेव बागडे याने बटाईने करायला घेतली आहे. काही दिससांपूर्वी मंगेशचा भाऊ गणेशसोबत शेतातील विहिरीवर लाईट लावण्याच्या कारणावरून गजाननने वाद घातला. 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता मंगेश शेतात गेला होता. झाडाखाली बसलेला असता तिथे गजानन बागडे आला. काठीने मंगेशच्‍या हातावर, पायावर मारहाण करून जखमी केले. पुन्हा शेतात येऊन दाखव, अशी धमकी दिली, असे तक्रारीत मंगेशने म्‍हटले आहे. अधिक तपास एएसआय श्री. महाले, पोकाँ श्री. डागोर करत आहेत.