नात्‍याला कलंक… “ती माझी सख्खी मुलगी नाही; ती मला खूप आवडते’ असे म्‍हणून निर्लज्ज सावत्र बापाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग!; खामगावातील घटना

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ती माझी सख्खी मुलगी नाही. ती मला खूप आवडते… असे म्हणत निर्लज्ज बापाने अल्पवयीन सावत्र मुलीचा विनयभंग केला. ही घटना वाडी (ता. खामगाव) येथे १८ जुलैला घडली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्याने काल ही घटना उजेडात आली. खामगाव शहर पोलिसांनी सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वाडी जय मातादीनगरात १४ …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ती माझी सख्खी मुलगी नाही. ती मला खूप आवडते… असे म्हणत निर्लज्ज बापाने अल्पवयीन सावत्र मुलीचा विनयभंग केला. ही घटना वाडी (ता. खामगाव) येथे १८ जुलैला घडली. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिल्याने काल ही घटना उजेडात आली. खामगाव शहर पोलिसांनी सावत्र पित्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

वाडी जय मातादीनगरात १४ वर्षीय मुलगी तिच्या आई आणि सावत्र बापासोबत राहते. तिची आई स्वयंपाकाच्या कामासाठी बाहेर गेल्यावर तिचा सावत्र बाप तिला वाईट उद्देशाने स्पर्श करायचा. अनेकवेळा त्याने असे कृत्य केल्याने १८ जुलैला मुलीने ही बाब तिच्या आईला सांगितली. याबाबत तिच्या आईने विचारणा केली असता, ती माझी सख्खी मुलगी नाही. ती मला खूप आवडते. तू मध्ये पडू नको, असे म्हणत त्‍याने तिच्या आईलाही मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत पीडितेने म्‍हटले आहे.