नाना मित्राचेच घर फोडायचे का? नाना म्‍हणाले, आम्‍हाला पक्ष वाढवायचाय..!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोरोना काळातील पक्षाचे योगदान आणि एकूण संघटनाची चाचपणी करण्यासाठी ते आले आहेत. मात्र यानिमित्ताने काहींचे पक्षप्रवेश घडतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. विशेष करून भाजपातील मातब्बरांना काँग्रेसमध्ये ओढले जाईल, अशी चर्चा असताना, शत्रूपेक्षा मित्रच बरा या न्यायाने काँग्रेसने आपल्या मित्रपक्षाचे घर फोडण्याचे काम …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जिल्हा दौऱ्यावर आहेत. कोरोना काळातील पक्षाचे योगदान आणि एकूण संघटनाची चाचपणी करण्यासाठी ते आले आहेत. मात्र यानिमित्ताने काहींचे पक्षप्रवेश घडतील, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत होती. विशेष करून भाजपातील मातब्‍बरांना काँग्रेसमध्ये ओढले जाईल, अशी चर्चा असताना, शत्रूपेक्षा मित्रच बरा या न्यायाने काँग्रेसने आपल्या मित्रपक्षाचे घर फोडण्याचे काम केले आहे. चिखलीत शिवसेनेचे माजी शहरप्रमुख नीलेश अंजनकर यांनी काही कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्‍यामुळे नाना आले, भाजप फोडायला पण फोडले मित्रपक्षाचे घर, अशी जोरदार चर्चा जिल्ह्याच्‍या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

चिखलीत भाजप नगरसेवकासह काही नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र ऐनवेळी काहीतरी बिनसले आणि भाजपच्या या मंडळींचा काँग्रेस प्रवेश लांबणीवर पडल्‍याचे सांगण्यात आले. सध्या महाविकास आघाडीचा राजकीय शत्रू भाजपा असताना काँग्रेसने मित्रपक्षाच्याच नेत्यांना फोडल्यामुळे शिवसेनेतूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याबद्दल बुलडाणा येथे पत्रपरिषदेत नाना पटोले यांना छेडले असता आम्ही पक्ष वाढवण्यावर भर देत आहे. भाजपच्या मोठ्या नेत्यांचा मोठा प्रवेश सोहळा सुद्धा लवकर होणार आहे .राज्यातील भाजपचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहे, असेही ते म्हणाले. पक्षसंघटन मजबूत करून आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचा त्यांनी पुनरूच्‍चार केला.