नापिकीचा बळी! शेगाव तालुक्‍यात शेतकऱ्याने शेतातच पिले तणनाशक!; देऊळगाव महीत खासगी सावकारीचा बळी!

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे भास्तन जुने (ता. शेगाव) येथील 52 वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 मार्चला रात्री 9 च्या सुमारास वाजता घडली. परमेश्वर शेषराव मिरगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या नावे 3 एकर तर त्यांची पत्नी कावेरी यांच्या नावे दीड एकर शेती आहे. त्यांच्यावर बँक …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे भास्‍तन जुने (ता. शेगाव) येथील 52 वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना 26 मार्चला रात्री 9 च्‍या सुमारास वाजता घडली.

परमेश्वर शेषराव मिरगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्‍यांच्या नावे 3 एकर तर त्‍यांची पत्‍नी कावेरी यांच्या नावे दीड एकर शेती आहे. त्‍यांच्‍यावर बँक ऑफ महाराष्ट्र्रच्‍या माटरगाव शाखेचे कर्ज होते. पीक कर्ज आणि त्याच पीक कर्जाचे पुनर्गठण असे दोन वेळेस त्‍यांनी कर्ज घेतले होते. ती रक्कम दीड लाख रुपये असल्याचे कळते. तसेच कोटक महिंद्रा फायनान्सकडून मागील वर्षी त्‍यांनी ट्रॅक्टर घेतले. ते अंदाजे कर्ज 5 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येते. 26 मार्चच्‍या रात्री 9 वाजता त्‍यांनी शेतातच विषारी तणनाशक घेतले. त्‍यांना नातेवाइकांनी खामगावच्‍या खासगी रुग्‍णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्‍यांचा मृत्‍यू झाला. मागील दोन वर्षे सतत नापिकीमुळे आणि कर्जाला कंटाळून त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलून जीवनयात्रा संपवली. त्‍यांच्‍या पश्चात आई-वडील, पत्नी,आणि दोन मुले असा परिवार आहे.

देऊळगाव महीत युवकाने घेतला गळफास

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः देऊळगाव मही (ता. देऊळगाव राजा) येथील 25 वर्षीय युवकाने राहत्‍या घरी काल, 27 मार्चला दुपारी गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. गणेश विजय अंधारे असे त्‍याचे नाव आहे. ही आत्‍महत्‍या खासगी सावकारीला कंटाळून झाल्‍याचे सूत्रांकडून समजते. याबाबत पोलीस तपास करत आहेत.