नापिकीमुळे आर्थिक कोंडी; लोणार तालुक्यात 2 शेतकर्‍यांची आत्महत्या

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नापिकीमुळे आर्थिक कोंडी होऊन तालुक्यातील 2 शेतकर्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 1 फेब्रुवारीला शिवणी पिसा व सुलतानपूर येथे समोर आली..शिवणी पिसा येथील शेतकरी केशव विश्वनाथ वाघ (53) यांनी गाव शिवारातील बोरीच्या झाडाला गळफास घेतला. केशव वाघ यांनी नापिकीमुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. अतिवृष्टीत त्यांचे सोयाबीन पिक वाहून गेले …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नापिकीमुळे आर्थिक कोंडी होऊन तालुक्यातील 2 शेतकर्‍यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना 1 फेब्रुवारीला शिवणी पिसा व सुलतानपूर येथे समोर आली..
शिवणी पिसा येथील शेतकरी केशव विश्‍वनाथ वाघ (53) यांनी गाव शिवारातील बोरीच्या झाडाला गळफास घेतला. केशव वाघ यांनी नापिकीमुळे आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. अतिवृष्टीत त्यांचे सोयाबीन पिक वाहून गेले होते. त्यामुळे ते आर्थिक कोंडीत सापडले होते. त्यांच्या पश्‍चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.
दुसर्‍या घटनेत सुलतानपूर येथील शेतकरी पुंजाजी बळीराम जाधव (50) यांनी बोराखेडी रोडवरील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. ते आर्थिक अडचणीत सापडले होते. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, पत्नी आहे. तपास मेहकरचे पोलीस निरिक्षक आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार प्रभाकर सानप, पोकाँ निवृत्ती सानप करत आहेत.