नापिकी, उसनवारीचा डोंगर…शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नापिकी आणि उसनवारीचा डोंगर, कुटुंबाच्या गरजा भागतील इतकेही पैसे नसल्याने नैराश्य आलेल्या 38 वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. ही घटना आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथे 18 मार्चला समोर आली. सुभाष भिकाजी वरगट (रा. आसलगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते भूमिहिन होते, मात्र दुसऱ्याची …
 

जळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नापिकी आणि उसनवारीचा डोंगर, कुटुंबाच्‍या गरजा भागतील इतकेही पैसे नसल्याने नैराश्य आलेल्या 38 वर्षीय शेतकऱ्याने विष घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना आसलगाव (ता. जळगाव जामोद) येथे 18 मार्चला समोर आली.

सुभाष भिकाजी वरगट (रा. आसलगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते भूमिहिन होते, मात्र दुसऱ्याची शेती कसण्यासाठी त्‍यांनी घेतली होती. प्रचंड मेहनत करूनही हाती अपेक्षित उत्‍पन्न न आल्याने ते चिंतित होते. उसनवारीचे पैसे कसे फेडणार, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवणार या विवंचनेतून त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलले, असे त्‍यांच्‍या निकटवर्तीयांनी सांगितले.