नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; चिखली तालुक्‍यातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, 15 मे रोजी सकाळी मेरा बुद्रूक (ता. चिखली) येथे समोर आली. प्रकाश विक्रम पडघान (रा. मेरा बुद्रूक) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक आहेत. आर्थिक कोंडीत सापडल्याने नैराश्य येऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे …
 

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 45 वर्षीय शेतकऱ्याने राहत्‍या घरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केल्याची घटना आज, 15 मे रोजी सकाळी मेरा बुद्रूक (ता. चिखली) येथे समोर आली.

प्रकाश विक्रम पडघान (रा. मेरा बुद्रूक) असे आत्‍महत्‍या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभूधारक आहेत. आर्थिक कोंडीत सापडल्‍याने नैराश्य येऊन त्‍यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे त्‍यांच्‍या कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्‍थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणी आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.