नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याची राहत्या घरात आत्महत्या!; मलकापुरातील घटना

मलकापूर (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर तालुक्यातील वाघुड येथील अल्पभूधारक शेतकर्याने राहत्या घरात बाथरूमसमोरील छताच्या बांबूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 24 जानेवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.शंकर रामभाऊ महाले असे या शेतकर्याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून, सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर …
 

मलकापूर (ज्ञानेश्‍वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सततच्या नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मलकापूर तालुक्यातील वाघुड येथील अल्पभूधारक शेतकर्‍याने राहत्या घरात बाथरूमसमोरील छताच्या बांबूला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, 24 जानेवारीला सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली.
शंकर रामभाऊ महाले असे या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांच्याकडे दोन एकर शेती असून, सततच्या नापिकीमुळे त्यांच्यावर बँकांचे कर्ज वाढले आहे. परिवाराचे पालन-पोषण करणेही अशक्य झाल्याने त्यांना नैराश्य आले होते. यातच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. वाघुडचे माजी सरपंच उद्धव ठाकरे, पोलीस पाटील गजानन तायडे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. घटनास्थळी एपीआय स्मिता म्हसाये. पोकाँ मंगेश चरखे, पोकाँ प्रमोद राठोड आदींनी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शंकर महाले यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.