ना वऱ्हाडींना मास्‍क, ना सुरक्षित अंतर अन्‌ म्‍हणे वाजवा रे वाजवा… पोलिसांनी वर-वधूपित्‍याविरुद्ध केले गुन्‍हे दाखल!; खामगाव तालुक्‍यातील घटना

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करून लग्न लावणाऱ्या वर-वधूच्या पित्याविरुद्ध जलंब पोलिसांनी आज, 22 एप्रिलला दुपारी गुन्हे दाखल केले. ही घटना खामगाव तालुक्यातील चिखली खुर्द येथे घडली. पोलीसउपनिरिक्षक राहूल राजाभाऊ कातकाडे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून ओंकार किसन तांदळे (55, रा. चिखली खुर्द ता. खामगाव) व सुखदेव निनू इंगळे (54, …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करून लग्‍न लावणाऱ्या वर-वधूच्‍या पित्‍याविरुद्ध जलंब पोलिसांनी आज, 22 एप्रिलला दुपारी गुन्‍हे दाखल केले. ही घटना खामगाव तालुक्‍यातील चिखली खुर्द येथे घडली.

पोलीसउपनिरिक्षक राहूल राजाभाऊ कातकाडे यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्‍यावरून ओंकार किसन तांदळे (55, रा. चिखली खुर्द ता. खामगाव) व सुखदेव निनू इंगळे (54, रा. येनगाव ता. बोदवड जि. जळगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हे दाखल झाले. चिखली खुर्द येथे आज पाऊणच्‍या सुमारास लग्‍न समारंभाचा कार्यक्रम सुरू होता. मोकळ्या जागेत मंडप टाकून किसन तांदळे यांच्या मुलीचे लग्न लागत होते. लग्‍नाला 35 ते 40 जण हजर होते. मात्र ते सुरक्षित अंतर बाळगून नव्‍हते. अनेकांच्‍या तोंडाला मास्कही नव्‍हता. जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे संकट गडद होत चालले असताना दिलेल्या या हलगर्जीपणामुळे जलंब पोलिसांनी कारवाई केली. या लग्‍नासाठी तहसीलदारांचीही परवानगी घेण्यात आलेली नव्‍हती. तपास सहायक फौजदार दिनकर तिडके करत आहेत.