निंबा फाट्यावर ग्रामस्‍थांनी अडवला महामार्ग!; कारण आहे वाहनधारकांचा धोक्‍यात येणारा “जीव’

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील जानेफळ बायपासनजीक निंबा फाट्याजवळ शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर दोन्ही बाजूंनी नाल्या नसल्याने लाल माती रस्त्यावर वाहून येते. यामुळे वाहने घसरून अपघात वाढले आहेत. अनेकांना यामुळे गंभीर दुखापतसुद्धा झाली.”एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी आज, २२ जुलैला सकाळी अर्धा तास रस्त्यावर ठाण मांडले होते. …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर तालुक्यातील जानेफळ बायपासनजीक निंबा फाट्याजवळ शेगाव ते पंढरपूर पालखी महामार्गावर दोन्‍ही बाजूंनी नाल्‍या नसल्याने लाल माती रस्त्यावर वाहून येते. यामुळे वाहने घसरून अपघात वाढले आहेत. अनेकांना यामुळे गंभीर दुखापतसुद्धा झाली.”एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्‍त ग्रामस्‍थांनी आज, २२ जुलैला सकाळी अर्धा तास रस्‍त्‍यावर ठाण मांडले होते.

कार्यकारी अभियंता श्री. शिंदे यांनी आंदोलनस्‍थळी येत दोन महिन्यांत पक्‍क्या नालीचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले. त्‍यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले. गोपाल ढोणे, अंकुश वानखेडे, पंडित ढोणे यांच्यासह ग्रामस्‍थांनी हे आंदोलन केले. जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गोंधे, ज्येष्ठ नेते संतोषराव तोंडे, विश्वासराव सवडदकर, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा हावरे, अमर राऊत, गजानन दुतोंडे, गणेश सवडतकर, श्रीकृष्ण काकडे, प्रमोद मिश्रा, पोलीस कॉस्टेबल राजेश गौड यावेळी उपस्थित होते. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. रस्ता हा नव्यानेच झाल्याने वाहनांना वेगही असतो आणि या रस्त्यावर लाल माती साचलेली आहे. हे चालकांना माहिती नसल्याने वाहने स्लीप होतात. चारचाकी वाहनेसुद्धा उलटली आहेत. यावेळी जानेफळ पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष ठाणेदार राहुल गोंधे यांनी  स्वखर्चाने जेसीबी बोलवून रस्त्यावर साचलेली माती बाजूला केली.