नितीन गडकरी मेहकरात येत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण… मेहकर शहरातून जाणारा रस्‍ता पाहण्यासाठी याच… “या’ सामाजिक कार्यकर्त्याने घातले साकडे!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर यांच्या संगनमताने नियम डावलून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम पाहण्यासाठी व रस्त्याचे उद्घाटन करण्यासाठी तुम्ही मेहकरात याच… जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषणाला बसतो, असे साकडे मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी …
 
नितीन गडकरी मेहकरात येत नाहीत तोपर्यंत बेमुदत उपोषण… मेहकर शहरातून जाणारा रस्‍ता पाहण्यासाठी याच… “या’ सामाजिक कार्यकर्त्याने घातले साकडे!

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मेहकर शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गाचे बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झालेले आहे. कॉन्ट्रॅक्टर, इंजिनिअर यांच्या संगनमताने नियम डावलून रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याचे काम पाहण्यासाठी व रस्त्याचे उद्‌घाटन करण्यासाठी तुम्ही मेहकरात याच… जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत मी बेमुदत उपोषणाला बसतो, असे साकडे मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते विजय पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घातले आहे. काल, २५ ऑगस्ट रोजी पवार यांनी गडकरी यांची नागपूर येथे भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, चिखली, मलकापूर, खामगाव, उंद्री, शेगाव, सिंदखेडराजा या शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक आहे. मात्र ६५ हजार लोकवस्ती असलेल्या मेहकरात का नाही? या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. शाळेचे विद्यार्थी, मंदिरात जाणारे भाविक व समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी हाच एकमेव रस्ता आहे. रस्ता अरुंद तयार करण्यात येत असल्याने भविष्यात अनेक अपघात होऊ शकतात. त्यामुळे आपण व्यक्तिगत या कामात लक्ष घालावे व रस्ता बघण्यासाठी मेहकरात यावे, असे गडकरींना दिलेल्या पत्रात पवार यांनी म्हटले आहे. यासाठी पवार १ सप्टेंबरपासून उपोषणाला बसणार आहेत.