निपाणीतील एकाचा कोरोनामुळे मृत्‍यू; जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा 37 हजार पार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 30 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. उपचारादरम्यान निपाना (ता. मोताळा) येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बळींचा एकूण आकडा 255 वर गेला आहे. दिवसभरात 518 नव्या बाधितांची भर पडली असून, 887 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 30 मार्चला कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. उपचारादरम्यान निपाना (ता. मोताळा) येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्‍यामुळे बळींचा एकूण आकडा 255 वर गेला आहे. दिवसभरात 518 नव्‍या बाधितांची भर पडली असून, 887 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1956 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1438 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 518 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील  430 व रॅपीड टेस्टमधील 88 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 669 तर रॅपिड टेस्टमधील 769 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 88, बुलडाणा तालुका :  माळवंडी 1, साखळी खुर्द 1, सुंदरखेड 6, पांगरी 1, कोलवड 2, येळगाव 5, माळविहीर 1, रायपूर 2, नांद्रकोळी 2, पाडळी 1, मासरुळ 1, तराडखेड 1,  खामगाव शहर : 81,  खामगाव तालुका :  सुटाळा 11, कोक्ता 1, पळशी 2, अंत्रज 1, रोहना 1, गोंधनपूर 1, विहिगाव 3, हिवरखेड 1, संभापूर 2, आवार 5, गणेशपूर 3, घाटपुरी 10, निंभोरा 1, शिरसगाव 1,  नांदुरा तालुका : निमगाव 1,  मलकापूर शहर : 6,  चिखली शहर : 26, चिखली तालुका :  शेलूद 2, भरोसा 1,  सवणा 2, सातगाव भुसारी 1, पळसखेड दोलत 4, धोत्रा भनगोजी 1, उंद्री 2, केळवद 2, पांढरदेव 1, एकलारा 1, भाणखेड 1, भोकर 1, तेल्हारा 1, सोमठाना 1,  सिंदखेड राजा शहर : 23, सिंदखेड राजा तालुका :  साखरखेर्डा 7,  कंडारी 1,  शेंदुर्जन 2, गोरेगाव 6, दुसरबिड 3, पांगरी 2, शिंदी 1, बाळसमुद्र 1, पोफळशिवणी 1, बारलिंगा 1, सवडत 1, हनवतखेड 1, पि. लेंडी 1, राहेरी 1, शेलू 1, शेळगाव काकडे 1,  मोताळा तालुका :  पिंपळगाव देवी 2, धामणगाव बढे 3,  बोराखेडी 1, कोथळी 1, जयपूर 1, आव्हा 12, पुन्हई 1, लिहा 1, रामगाव 1,  मोताळा शहर : 1, शेगाव शहर : 25,  शेगाव तालुका : लासुरा 1, जलंब 1, येऊलखेड 1,  संग्रामपूर तालुका : सोनाळा 1, पळशी झांशी 1, अकोली खुर्द 1, वरवट बकाल 2,  देऊळगाव राजा शहर : 18, देऊळगाव राजा तालुका :  देऊळगाव मही 2, तुळजापूर 4, सतेफळ 1, गारखेड 1, डोढरा 1, सिनगाव जहागीर 2, अंढेरा 2, आळंद 2, गोंधनखेड 2, कुंभारी 2, पापळगाव 1, टकारखेड 1, सावखेड नागरे 2, नागणगाव 1, गिरोली बुद्रूक 1,  लोणार शहर : 16, लोणार तालुका : पांग्रा 1,  गायखेड 1, वडगाव 1, कुऱ्हा 1, शारा 1, पिंपळखुटा 1, भुमराळा 4, टिटवी 1,  मेहकर शहर : 15,  मेहकर तालुका : आरेगाव 1, डोणगाव 2, वेणी 1, उमरा 1, शिवणी 1, मादनी 1, बोरी 1, देऊळगाव माळी 1, लोणी 1, हिवरा आश्रम 1, नांदुरा शहर : 1, मूळ पत्ता बाळापूर 1, वालसावंगी ता. भोकरदन 1, जालना 1, अकोला 1, पारनेर जि. अहमद नगर 1, देऊळगाव उगले जि. जालना 1, भारज जि. जालना 1, अमरावती 1, लातूर 1, रिसोड 1, बैतूल (मध्य प्रदेश) 1  अशाप्रकारे जिल्ह्यात 518 रुग्ण आढळले आहेत.

रुग्णालयात 5755 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू

आज 887 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत 214790 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 31104 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 2919 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहे. जिल्ह्यात आज अखेर एकूण 37114 कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यापैकी 31104 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 5755 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 255 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.