निरोगी, सुदृढ व दीर्घायुष्यासाठी रोज योगा करावा; आमदार संजय गायकवाड यांचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः रोज योगा केल्याने आरोग्य उत्तम व निरोगी राहते. दुर्धर आजारांवर सुध्दा मात केली जाऊ शकते. योग हा निरामय आयुष्याचा सच्चा साथीदार. योगामुळे मन व शरीर शुध्द करून सुदृढ आयुष्य जगता येते. तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मक जगता येते. त्यामुळे रोज योगा करावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी आज, 21 जूनला …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रोज योगा केल्याने आरोग्य उत्तम व निरोगी राहते. दुर्धर आजारांवर सुध्दा मात केली जाऊ शकते. योग हा निरामय आयुष्याचा सच्चा साथीदार. योगामुळे मन व शरीर शुध्द करून सुदृढ आयुष्य जगता येते. तसेच योगामुळे आयुष्य सकारात्मक जगता येते. त्यामुळे रोज योगा करावा, असे आवाहन आमदार संजय गायकवाड यांनी आज, 21 जूनला केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, आयुष मंत्रालय, जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हींग, योग विद्याधाम नाशिक, योगांजली योग वर्ग, पतंजली योग समिती, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालयाच्‍या संयुक्त विद्यमाने आज सकाळी 7.00 ते 7.45 वाजेपर्यंत जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथे ऑनलाईन 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम आमदार संजय गायकवाड यांनी भारताचे महान ॲथलीट, आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारे, 1958 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक जिंकणारे, 1960 च्या ऑलीम्पीकमध्ये 400 मी. या बाबीमध्ये अंतीम फेरीत चवथे स्थान प्राप्त करणारे, पद्मश्री पुरस्काराने गौरविल्या गेलेले महान धावपटू स्व.मिल्खासिंग यांच्या प्रतिमेस हारअर्पण करून उपस्थित सर्वांच्या वतीने सामूहिक श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी श्री.जैन, नेहरू युवा केंद्राचे अजयसिंह राजपूत, भारत स्काऊट गाईडचे जिल्हा संघटक सुभाष आठवले, डॉ.राजेश्वर उबरहंडे आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित योग शिक्षीका सौ.अंजली परांजपे यांनी योग गिताचे सादरीकरण केले तसेच योग प्रार्थना सादर केली. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली योग दिन कार्यक्रमासाठीचे प्रात्यक्षिक सौ. अंजली परांजपे, प्रशांत लहासे व सचिन खाकरे यांनी सादर केले. या कार्यक्रमात उपस्थितांना योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह तसेच प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम हे प्रकार करून घेतले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. शेवटी सौ.अंजली परांजपे यांनी सादर केलेल्या प्रार्थनेने योग दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ऑनलाइन कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध शासकीय निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळे, महिला मंडळे, क्रीडा शिक्षक, खेळाडू, पालक, योगप्रेमी नागरिक गुगल मिट लिंक, फेसबुक पेज लाईव्ह, यु ट्युब चॅनलद्वारे सहभागी झाले होते. उपस्थितांना गणेश प्रभाकर जाधव, जुग्गत फार्मा यांच्‍याकडून एनर्जी ड्रिंक्‍सचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र धारपवार, क्रीडा अधिकारी यांनी तर आभार प्रदर्शन अनिल इंगळे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी केले. याप्रसंगी नेहरू युवा केंद्राचे धनंजय चाफेकर, ए.एस.पी.एम.महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद ढवळे, प्रा. कैलास पवार, अन्न व औषध विभागाचे श्री. घिरके, गोविंदा खुमकर, विजय वानखेडे तसेच योगप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ऑनलाईन तांत्रीक बाबीकरिता कैलास डुडवा, विनोद गायकवाड, किरण लहाने, अक्षय कराड, नवनाथ कारके तसेच कार्यालयातील जिल्हा संघटक गाईड सौ.मनिषा ढोके, विजय बोदडे वरिष्ठ लिपीक, कृष्णा नरोटे, गणेश डोंगरदिवे यांनी प्रयत्न केले, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.