निर्बंधांतही जिल्ह्यातून मेमध्ये 41 तरुणी, 19 महिला बेपत्ता; जूनचा पहिला दिवस पुरुषांनी केला कन्टिन्‍यू… आज 3 पुरुष गायब!!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या मे महिन्यात निर्बंध लावले होते. त्यातील दहा दिवस तर कडक लॉकडाऊनच होता. तरीही जिल्ह्यातून या महिन्यात तब्बल 41 तरुणी, 19 महिला आणि 13 पुरुष गायब झाले आहेत. मे असा गेल्यानंतर किमान जूनमध्ये तरी हे सत्र थांबेल असे वाटत असतानाच, चालू महिन्याचा पहिला …
 

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गेल्या मे महिन्यात निर्बंध लावले होते. त्‍यातील दहा दिवस तर कडक लॉकडाऊनच होता. तरीही जिल्ह्यातून या महिन्यात तब्‍बल 41 तरुणी, 19 महिला आणि 13 पुरुष गायब झाले आहेत. मे असा गेल्यानंतर किमान जूनमध्ये तरी हे सत्र थांबेल असे वाटत असतानाच, चालू महिन्याचा पहिला दिवस मात्र पुरुषांनी कन्‍टिन्‍यू केला आहे. आज, 1 जून रोजी 3 पुरुष बेपत्ता झाले आहेत. ते हरवल्याची तक्रार त्‍या त्‍या भागातील पोलीस ठाण्यांत करण्यात आली आहे.

साखळी बुद्रूक (ता. बुलडाणा) येथील विलास किशोर गायकवाड हा 22 वर्षीय तरुण घरातून निघून गेला आहे. तो हरवल्याची तक्रार त्‍याच्‍या घरच्‍यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिसांना दिली आहे. रूम्हणा (ता. सिंदखेड राजा) येथील रंगनाथ तुकाराम खेडकर हे 51 वर्षीय गृहस्‍थ घर सोडून गेले असून, किनगाव राजा पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय लाडनापूर (ता. संग्रामपूर) येथील भगवान रावजी आटकर हे 72 वर्षीय वृद्ध व्‍यक्‍तीनेही घर सोडले गेले आहे. सोनाळा पोलीस त्‍यांचा शोध घेत आहेत. गेल्या महिन्यात बेपत्ता झालेल्यांपैकी किती जण परतले याचे वृत्त बुलडाणा लाइव्‍ह उद्या देईल.

काल विवाहिता चिमुकलीसह बेपत्ता, एक तरुण, महिला गायब
कालचा महिन्याचा शेवटचा दिवस असला तरी गायब होण्याचे सत्र काही थांबले नाही. काल जळगाव जामोद येथील सायराबी रहीम खान ही 45 वर्षीय महिला, बुलडाण्यातील परदेशीपुऱ्यातून 19 वर्षीय करण अर्जुन मोरे हा तरुण बेपत्ता झाला. त्‍यांच्‍या हरवल्याची नोंद अनुक्रमे जळगाव जामोद आणि बुलडाणा शहर पोलिसांनी केली आहे. याशिवाय जयपूर लांडे (ता. खामगाव) येथील 33 वर्षीय सौ. कविता किसन पाखरे ही महिला आपल्या 7 वर्षीय मुलगी आरतीसह गायब झाली आहे. ती मुलीसह घरातून निघून गेल्याची तक्रार खामगाव शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.