निर्बंध आदेशात अंशतः बदल… कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार!; किराणा, फळे, भाजीपाला विक्रेत्‍यांना घरपोच पार्सल सुविधा देण्यास सायंकाळी 5 पर्यंत मुभा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, शेतीशी निगडित दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ जूनपर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्या …
 
निर्बंध आदेशात अंशतः बदल… कृषी सेवा केंद्र सकाळी ९ ते दुपारी ३ पर्यंत सुरू राहणार!; किराणा, फळे, भाजीपाला विक्रेत्‍यांना घरपोच पार्सल सुविधा देण्यास सायंकाळी 5 पर्यंत मुभा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा, मो. 9822988820) ः जिल्ह्यातील सर्व कृषि सेवा केंद्र, शेतीशी निगडित दुकाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात १ जूनपर्यंत सर्व किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, डेअरी सकाळी ७ ते सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्‍या आदेशात आज, 22 मे रोजी अंशत: बदल करण्यात आला आहे. या वेळेव्यतिरिक्त सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तू दुकाने, किराणा, स्वस्त धान्य दुकाने, भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने यांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत मुभा देण्यात येत आहे. तसेच दूध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री सकाळी ६ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८ सुरू राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. घरपोच दूध विक्री नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत.