निसर्गाचेही एकावर एक फ्री! मार्चमध्ये विजांचा कडकडाट अन्‌ पाऊसही!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ढगाळ वातावरण, डोक्यावर जमा झालेले काळेकुट्ट ढग, संध्याकाळीच दाटून आलेला काळाकुट्ट अंधार, थेंब थेंब गळ असा सुरू होऊन चांगलाच बरसलेला पाऊस आणि त्याच्या आगमनाबरोबरच गुल झालेली वीज… उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्चच्या मध्यावर पावसाचे (पावसाळ्याचे) वर्णन!होय, कारण हजारो बुलडाणेकरांना आज निसर्गाचा हा लहरीपणा, बिघडलेले रूप हे सर्व काही …
 

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः ढगाळ वातावरण, डोक्यावर जमा झालेले काळेकुट्ट ढग, संध्याकाळीच दाटून आलेला काळाकुट्ट अंधार, थेंब थेंब गळ असा सुरू होऊन चांगलाच बरसलेला पाऊस आणि त्याच्या आगमनाबरोबरच गुल झालेली वीज… उन्हाळ्याची चाहूल देणाऱ्या मार्चच्या मध्यावर पावसाचे (पावसाळ्याचे) वर्णन!
होय, कारण हजारो बुलडाणेकरांना आज निसर्गाचा हा लहरीपणा, बिघडलेले रूप हे सर्व काही पाहायला मिळाले. यामुळे निसर्गाने एका ऋतुवर एक ऋतू फ्री अशी काही स्कीम तर आणली नाही ना? असा मजेदार प्रश्न उपस्थित झाला. माणसासोबत राहून शिस्तबद्ध निसर्ग देखील बिघडला की काय अशी शंकाही निर्माण झाली. त्यातच हवामान खात्याचे अंदाज आजकाल भलतेच अचूक ठरताहेत हे आजच्या पावसाने सिद्ध झाले.

चिखली शहर व तालुक्यातही वादळीवाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्याचे वृत्त आहे.चिखली शहरातील वीजपुरवठा सुद्धा खंडित करण्यात आला आहे. देऊळगाव मही परिसरात सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.