नुकसानीने खचून जाऊ नका, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी!; महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्‍याकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा धीर राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज, १४ सप्टेंबरला शेतकऱ्यांना दिला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या …
 
नुकसानीने खचून जाऊ नका, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी!; महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्‍याकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा )ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा धीर राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज, १४ सप्‍टेंबरला शेतकऱ्यांना दिला.

नुकसानीने खचून जाऊ नका, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी!; महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्‍याकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी राज्यमंत्री सत्तार यांनी केली. बुलडाणा तालुक्यातील कोलवड शिवारात पैनगंगेच्या पुरामुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. पाडळी येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणीही त्यांनी केली. त्यानंतर मोताळा तालुक्यातील रोहिणखेड, बोराखेडी, अंत्री, वडगाव खंडोपंत येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यंत्रणांनी पंचनामे तातडीने पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय ग्राम समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव, पंचायत राज समिती अध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार संजय गायकवाड, बुलडाणा बाजार समिती सभापती जालिंधर बुधवत, उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, तहसीलदार रूपेश खंडारे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. डाबरे, तालुका कृषि अधिकारी श्री. मेरत आदी उपस्थित होते. या वेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. शासन सर्वोतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मोताळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी गणेश देशमुख, तहसीलदार श्री. सोनावणे व संबंधित तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

नुकसानीने खचून जाऊ नका, शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी!; महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्‍याकडून जिल्ह्यात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी

मंत्री सत्तारांनी सवणामध्ये दाखवले ई-पीक पाहणी प्रात्याक्षिक
राज्य शासनाने या खरीप हंगामापासून तंत्रज्ञानाचा उपयोग करत ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले. त्यानुसार शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरीत ई पीक पाहणी करीत आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या पिकांची माहिती या ॲपमध्ये भरून अचूक माहितीची नोंद करावी, असे आवाहन राज्याचे महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी चिखली तालुक्यातील सवणा येथे केले. चंदनशेष क्रीडा व व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.

कार्यक्रमाला खा. जाधव, आ. रायमूलकर, आ. गायकवाड यांच्‍यासह माजी जिल्‍हा परिषद अध्यक्ष नरेंद्र खेडेकर, माजी आमदार बोंद्रे, संस्थेचे अध्यक्ष पद्माकर भुतेकर, सचिव कैलास करवंदे, अभिजीत राजपूत, अर्जुन गाडे, सरपंच सत्यभामा सुरडकर आदी उपस्थित होते. सुरुवातीला मैदानावर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच 150 पाम वृक्षलागवड कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक कैलास करवंदे यांनी केले. त्यानंतर शेतकरी अनंत भुतेकर यांच्या शेतात ई- पीक पाहणी प्रात्याक्षिक करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. हांडे, तहसीलदार श्री. येळे, तालुका कृषि अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते.