नेताजी जागर साहित्य संमेलन ः कविवर्य भगवान ठग साहित्यनगरी सज्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहिलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत 23 जानेवारी रोजी होत आहे. यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे.महानायक कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बुलडाणा अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर हे स्वागताध्यक्ष तर पालकमंत्री डॉ. …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांना वाहिलेले नेताजी जागर साहित्य संमेलन बुलडाणा नगरीत 23 जानेवारी रोजी होत आहे. यासाठी स्मृतीशेष कविवर्य भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे.महानायक कादंबरीकार, ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील हे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बुलडाणा अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर हे स्वागताध्यक्ष तर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उद्घाटक राहणार आहेत.

सकाळी नऊ वाजता नेताजी सुभाषचंद्र बोस चौक (संगम चौक ) या ठिकाणाहून ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. यावेळी प्राचार्य शहिनाताई पठाण, जयसिंगराजे देशमुख, सुनील सपकाळ, प्राध्यापक अनंत शिरसाठ, नरेंद्र लांजेवार, डॉ. गणेश गायकवाड, गणेश निकम, कडुबा बनसोडे, सुरेश साबळे, शशिकांत इंगळे आदी साहित्यिक सहभागी होतील. या ग्रंथदिंडीचे नियोजन सुरेखाताई निकाळजे, जगदीशचंद्र पाटील, हभप गजानन महाराज गायकवाड, शाहीर खांडेभर्‍हाड व जगदेव महाराज यांच्याकडे राहणार आहे.

दहा वाजता साहित्य संमेलनाचे पालकमंत्री नामदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील, स्वागताध्यक्ष बुलडाणा अर्बनचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर, आमदार संजय गायकवाड, पत्रकार पुरुषोत्तम आवारे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, नगराध्यक्षा नजमुन्निसा बेगम मो. सज्जाद, जयश्रीताई शेळके, शाहीनताई पठाण, डॉ. गणेश गायकवाड, नरेंद्र लांजेवार, सुरेश साबळे, निमंत्रक जयसिंगराजे देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती राहील. प्रास्ताविक अ‍ॅड. सतिशचंद्र रोठे, सूत्रसंचालन रणजितसिंह राजपूत करतील. आभार श्रीकृष्ण भगत मानतील. स्वागतगीत शाहीर बाबूसिंह राजपूत कला मंच सादर करणार आहे.

पहिला परिसंवाद शेतकरी कायदे आणि वर्तमान या विषयावर आहे. परिसंवादामध्ये ज्येष्ठ शेतकरी नेते प्रकाशभाऊ पोहरे, चिखलीच्या आमदार श्‍वेताताई महाले, रविकांत तुपकर, पुरुषोत्तम गावंडे, अशोकराव सोनवणे, अविनाश काकडे, गजानन अहमदाबादकर, दिनकर दाभाडे, अ‍ॅड. हरिश रावळ आदी सहभागी होणार आहेत. सूत्रसंचलन गणेश निकम करतील. आभार प्रदर्शन राम हिंगे करतील. दुपारी तीन वाजता पुढील परिसंवादाला सुरुवात होईल. नेताजींच्या विचारांची आज आवश्यकता या परिसंवादात बरोमासकार सदानंद देशमुख, इतिहासकार चंद्रशेखर शिखरे, अनंत शिरसाठ, आनंद मांजरखेडे आदी सहभागी होत आहे. अतिथी राधेश्याम चांडक आहेत. या परिसवादानंतर कथाकथन आहे.

समारोपीय सत्राचे अध्यक्ष संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास पाटील हे आहेत. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व ठरावांचे वाचन होईल. नाट्य कलावंत शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला फेम राजकुमार तांगडे, खासदार प्रतापराव जाधव, गजानन दादा पाटील, आमदार राजेश एकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते, डेप्युटी सिईओ राजेश लोखंडे, वृषालीताई बोंद्रे अतिथी आहेत. सूत्रसंचालन नरेंद्र लांजेवार करतील. त्यानंतर रात्री कवी संमेलनाचे आयोजन आहे.

प्रसिद्ध शायर डॉक्टर गणेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बहुभाषिक कवि संमेलनामध्ये राज्यातील, जिल्ह्यातील कवी सहभागी होत आहे. तसेच कार्यक्रमस्थळी कवी नवोदित कवींसाठी एक दिवसीय कट्ट्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाभरातून येणारे नवोदित कवी यांना या कवी कट्ट्यामध्ये स्थान देण्यात आले आहे.  राजेश साळवे हे कवी कट्ट्याचे अध्यक्ष असून नंदकुमार बोरबळे यांच्याकडे संचलन व नियोजनाची जबाबदारी आहे. एकूणच राज्यस्तरीय नेताजी जागर साहित्य संमेलनासाठी स्वर्गीय भगवान ठग साहित्य नगरी सज्ज झाली आहे. साहित्य संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन मुख्य संयोजक तथा आयोजक सतीशचंद्र रोठे, संजय एन्डोले, प्रशांत यशवंत पाटील मुंबई, हनुमंत वाबळे पुणे, ज्ञानेश्‍वर अण्णा दळवी पुणे, अरुण पाटील मुंबई, श्रीकृष्ण भगत मलकापूर, डॉ.अमित दुखंडे आदींनी केले आहे.