नोंदणीकृत घरेलू कामगारांनी कागदपत्रे सादर करावी; सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्यात कोविड -19 संसर्ग पार्श्वभूमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी 1500 रुपये मदतीचा आधार मिळणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्गत 2011 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यात कोविड -19 संसर्ग पार्श्वभूमीवर घरकाम करणाऱ्या नोंदणीकृत घरेलू कामगारांना राज्य शासनामार्फत प्रत्येकी 1500 रुपये मदतीचा आधार मिळणार आहे. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळातर्गत 2011 ते 31 मार्च 2021 या कालावधीत नोंदणी केलेल्या घरेलू कामगारांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ मिळण्याकरिता बँकेचे पासबुक, नोंदणीकृत नुतनीकरणाची पावती, आधारकार्ड, रेशनकार्ड आवश्यक सर्व कागदपत्रे, मोबाईल क्रमांक स्वयंसाक्षांकित करून कार्यालयाच्या gharelubuldhana@gmail.com या ईमेल आयडीवर सादर करावे. जेणेकरून कुठलाही नोंदीत घरेलू कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.