नोकरी मिळत नसल्याने मेकॅनिकल इंजिनिअरची आत्‍महत्‍या; मलकापूर तालुक्‍यातील घटना

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नोकरी मिळत नसल्याने नैराश्य येऊन मेकॅनिकल इंजिनिअरने आत्महत्या केल्याची घटना बोदवड (ता. मलकापूर) शिवारात काल, 3 जून रोजी सायंकाळी घडली. अमर अनिल चोपडे (23, रा. माता महाकालीनगर, मलकापूर) असे आत्महत्या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. त्याने नायलॉन दोरीच्या साह्याने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः नोकरी मिळत नसल्याने नैराश्य येऊन मेकॅनिकल इंजिनिअरने आत्‍महत्‍या केल्याची घटना बोदवड (ता. मलकापूर) शिवारात काल, 3 जून रोजी सायंकाळी घडली.

अमर अनिल चोपडे (23, रा. माता महाकालीनगर, मलकापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्या इंजिनिअरचे नाव आहे. त्‍याने नायलॉन दोरीच्‍या साह्याने शेतातील लिंबाच्‍या झाडाला गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्‍थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. त्‍याच्‍या खिशात सुसाईड नोट सापडली असून, त्‍यात त्‍याने नोकरी मिळत नसल्याने मानसिक तणावातून आत्‍महत्‍या करत असल्याचे म्‍हटले आहे. या घटनेबद्दल हळहळ व्‍यक्‍त होत आहे.