न्‍यूड फोटोशूटसाठी रोज देणार होते २५ हजार!; निकिताचा धक्कादायक खुलासा

मुंबई : बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पाॅर्न फिल्म प्रकरणी अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रारी द्यायला अनेक जणी पुढे येत आहेत. निकिता फ्लोरा सिंह हिनं आता पुढे येत राज आणि उमेश कामत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुलींना, अभिनेत्रींना चांगलं काम द्यायचं आमिष दाखवून त्यांना …
 

मुंबई : बाॅलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला पाॅर्न फिल्म प्रकरणी अटक झाल्यानंतर वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. त्यांच्याविरोधात तक्रारी द्यायला अनेक जणी पुढे येत आहेत. निकिता फ्लोरा सिंह हिनं आता पुढे येत राज आणि उमेश कामत यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

मुलींना, अभिनेत्रींना चांगलं काम द्यायचं आमिष दाखवून त्यांना अश्लील फिल्म करायला लावण्याचा राज कुंद्रा याचा धंदा उघडकीस आल्यानंतर आता अनेकांना आपलीही फसवणूक झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. त्या वेळी माैन बाळगणाऱ्या अभिनेत्री कुंद्राला अटक झाल्यानंतर बोलायला लागल्या आहेत. निकिता हिनं राज कुंद्रा आणि उमेश कामत यांनी पाॅर्न फिल्मचा बिझनेस वाढवण्यासाठी अभिनेत्रींना पैशाचं आमिष दाखविलं होतं, असा गंभीर आरोप केला आहे. निकिता फ्लोरा सिंह हिनं उमेशवर आरोप करताना आपल्यालाही राज कुंद्राच्या हॉटशॉट्स अॅप न्यूड शूट करण्यासाठी विचारणा केली होती, असं म्हटलं आहे.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेली ही आॅफर आपण नाकारली होती, असं तिनं सांगितलं. उमेश कामतनं रोज २५ हजार रुपये देण्याचं आमिष दाखविलं होतं; पण असं न्यूड शूट करण्याचं मी नाकारलं, असं ती म्हणते. करिअरमध्ये संघर्ष करत असलेल्या अनेक अभिनेत्रींना पैशाचं आमिष दाखवण्यात आलं. त्यांना या बिझनेसमध्ये ओढलं. राज कुंद्रासाठी काम केल्यामुळं झाराखंडच्या एका मुलीचा घटस्फोट झाला, असा आरोपही निकितानं केला आहे. अभिनेत्री श्रुती गेरानं असेच गंभीर आरोप केले आहेत. बॉलिवूडमध्ये नवोदित कलाकारांना ड्रग्ज दिलं जातं. ड्रग्ज घेतले, की त्यांना भान राहत नाही. त्यानंतर त्यांचे न्यूड व्हिडिओ काढले जातात. त्याचंच भांडवल करून नवोदित कलाकारांकडून पॉर्न फिल्ममध्ये जबरदस्तीनं काम करून घेतलं जातं, असा आरोप श्रुतीनं केला आहे.