पंक्‍चर पडले सव्वा लाखाला!; मेहकरमध्ये कारच्या समोरील सीटवर ठेवलेली पैशांची थैली लांबवली, किराणा व्यावसायिकाला लुटले

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंक्चर काढेपर्यंत चोरट्याने कारमधील १ लाख २७ हजार रुपये असलेली थैली चोरून नेली. ही घटना मेहकर शहरातील डोणगाव रोडवरील डाॅ. पाखरे यांच्या नवीन बांधकाम झालेल्या ठिकाणी स्मार्ट माॅलसमोर ३० ऑगस्टला दुपारी ३ च्या सुमारास घडली. बरटाळा (ता. मेहकर) येथील किराणा व्यावसायिक सुनील भिमराव हिवाळे (४३) यांच्यासोबत हा प्रकार घडला असून, …
 
पंक्‍चर पडले सव्वा लाखाला!; मेहकरमध्ये कारच्या समोरील सीटवर ठेवलेली पैशांची थैली लांबवली, किराणा व्यावसायिकाला लुटले

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पंक्‍चर काढेपर्यंत चोरट्याने कारमधील १ लाख २७ हजार रुपये असलेली थैली चोरून नेली. ही घटना मेहकर शहरातील डोणगाव रोडवरील डाॅ. पाखरे यांच्‍या नवीन बांधकाम झालेल्या ठिकाणी स्मार्ट माॅलसमोर ३० ऑगस्‍टला दुपारी ३ च्‍या सुमारास घडली. बरटाळा (ता. मेहकर) येथील किराणा व्यावसायिक सुनील भिमराव हिवाळे (४३) यांच्‍यासोबत हा प्रकार घडला असून, त्‍यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

हिवाळे यांचे बरटाळा येथे किराणा दुकान आहे. ते नेहमी किराणा दुकानाचे सामान घेण्यासाठी मेहकरला येत असतात. ३० ऑगस्‍टला दुपारी ते पत्नी व मुलासह कारने मेहकरला आले. पत्नी व मुलास कृष्ण मंदिरात जायचे असल्याने दोघांना तेथे उतरवून ते गुरुकृपा एजन्सीवर आले. त्यांची किराणा दुकानाची उधारी असलेले १ लाख ७३ हजार रुपये त्‍यांना राेख दिले.

आसाम चाय नावाच्‍या हिरव्या थैलीत उरलेले १ लाख २७ हजार रुपये त्‍यांनी ठेवले होते. नंतर कारने ते महेश ट्रेडिंग कंपनीकडे किराणा दुकानासाठी सामान घ्यायला निघाले. याचदरम्‍यान एका अनोळखी मोटारसायकलस्वाराने त्‍यांना कारचे टायर पंक्‍चर झाल्याचे सांगितले. त्‍यांनी कार थांबवून तपासले असता चाक पंक्‍चर दिसले. त्‍यांनी पैशांची थैली समोरच्या डाव्या साईडच्‍या सिटवर ठेवली होती व गाडी लॉक केली होती. मात्र चालकाच्‍या बाजूचा काच बंद करायला ते विसरले. स्‍टेपनी काढून त्‍यांनी चाक बदलले आणि महेश ट्रेडिंग कंपनीत गेले. तेथे सामान घेतल्यानंतर पैसे घेण्यास गेले असता थैली दिसली नाही. चोरट्यांनी १ लाख २७ हजार रुपये असलेली थैलीच गायब केली होती. तपास मेहकर पोलीस करत आहेत.