पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना कॉल!

पत्नी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस; देवेगौडांनाही केला होता मोदींनी फोन मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणार्या राजकीय व सामाजिक टीकाकारांची संख्या देशात कमी नाही. त्यांच्या टीकाकारांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यांना हुकुमशहा, कठोर प्रशासक म्हणूनही नावे ठेवली गेली आहेत. परंतु मोदी वैयिक्तक संबंध जपण्यावर भर देतात. अनेकांना व्यक्तिगत आणि नियमित फोन करून मोदी …
 

पत्नी रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस; देवेगौडांनाही केला होता मोदींनी फोन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणार्‍या राजकीय व सामाजिक टीकाकारांची संख्या देशात कमी नाही. त्यांच्या टीकाकारांत दिवसेंदिवस वाढच होत आहे. त्यांना हुकुमशहा, कठोर प्रशासक म्हणूनही नावे ठेवली गेली आहेत. परंतु मोदी वैयिक्तक संबंध जपण्यावर भर देतात. अनेकांना व्यक्तिगत आणि नियमित फोन करून मोदी त्यांची विचारपूस करत असतात,असे त्यांना ओळखणारे सांगतात. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचे संबंध कमालीचे ताणले गेलेले असतानाच पंतप्रधान मोदींनी अनपेक्षितरित्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या तब्येतीची विचारपूस केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उद्धव यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व पुत्र आदित्य ठाकरे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातही रश्मी यांना खोकल्याचा ़त्रास होत असून त्या रिलायन्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मोदींनी ठाकरेंना फोन करून त्यांच्या तब्येतची विचारणा करत त्यांंनी लवकर बरे व्हावे म्हणून चांगल्या आरोग्यसाठी शुभेच्छा दिल्या. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व त्यांच्या पत्नीही सध्या कोरोनाने आजारी असून त्यांनाही दोन दिवसांपूर्वी मोदींनी फोन केला होता. देवेगौडा यांनी लवकर बरे व्हावे, अशा शुभेच्छा देतानाच तुम्हाला देशात कुठल्याही शहरात उपचारासाठी जायचे असेल तर सांगा, व्यवस्था करतो, असे मोदींनी आवर्जून सांगितले. देवेगौडा यांनीच ही माहिती ट्विटरवर दिली. मोदींच्या बोलण्याने आपण भारावलो असल्याचे देवेगौडा म्हणाले. मोदींच्या या फोन डिप्लोमसीची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.