पतंगाचा मांजा चेहऱ्यावर अडकल्याने दुचाकीस्वार गंभीर; खामगाव शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पतंगाचा मांजा चेहऱ्यावर अडकल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, १० ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास खामगाव रोडवरील मानराज मोटर्ससमोर घडली. खामगाव येथील बाळापूर नाका परिसरातील सलूजा ऑटोमोबाईलचे संचालक सतपालसिंग सलूजा यांचा मुलगा अश्विनदरसिंग सलूजा हा दुकानातून घराकडे निघाला होता. रस्त्याने जात असताना मानराज मोटर्ससमोर पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या …
 
पतंगाचा मांजा चेहऱ्यावर अडकल्याने दुचाकीस्वार गंभीर; खामगाव शहरातील घटना

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पतंगाचा मांजा चेहऱ्यावर अडकल्याने दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. ही घटना आज, १० ऑगस्टला दुपारी अडीचच्या सुमारास खामगाव रोडवरील मानराज मोटर्ससमोर घडली.

खामगाव येथील बाळापूर नाका परिसरातील सलूजा ऑटोमोबाईलचे संचालक सतपालसिंग सलूजा यांचा मुलगा अश्विनदरसिंग सलूजा हा दुकानातून घराकडे निघाला होता. रस्त्याने जात असताना मानराज मोटर्ससमोर पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या चेहऱ्यावर अडकला. पतंगाच्या मांज्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या पापण्या फाटल्या व डोळ्यांना जबर दुखापत झाली. त्याला लगेच खासगी दवाखान्यात हलविण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.