पतीचे दुसरे लग्न लावले… बुलडाण्यात विवाहितेचा राडा!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीचे दुसरे लग्न लावून देणार्या नणंद व तिच्या पतीच्या घरात विवाहितेने राडा केला. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पविरोधी तक्रारी दिल्याने शिविगाळ मारहाण, विनयभंग प्रकरणी पोलिसांनी आज, 1 फेब्रुवारीला गुन्हे दाखल आहेत. ही घटना शहरातील हाजी मलंग दर्गा जवळील जिजाऊ कॉलनीत 31 जानेवारीच्या सकाळी घडली.कामिना लक्ष्मण शिराळे हिने तक्रार दिली, की …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीचे दुसरे लग्न लावून देणार्‍या नणंद व तिच्या पतीच्या घरात विवाहितेने राडा केला. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्पविरोधी तक्रारी दिल्याने शिविगाळ मारहाण, विनयभंग प्रकरणी पोलिसांनी आज, 1 फेब्रुवारीला गुन्हे दाखल आहेत. ही घटना शहरातील हाजी मलंग दर्गा जवळील जिजाऊ कॉलनीत 31 जानेवारीच्या सकाळी घडली.
कामिना लक्ष्मण शिराळे हिने तक्रार दिली, की घरात काम करत असताना तिची वहिणी संगीता राहुल सरसरे (30, रा. बुलडाणा), वहिणीचा भाऊ संजय चिंचोले (रा. लोणी लव्हाळा), कमलबाई चिंचोले (रा. लोणी लव्हाळा) हे तिघे घरात आले. शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संगीता व तिच्या आईने केस पकडून चापट बुक्क्यांनी मारहाण केली. संगिताचा भाऊ संजयने वाईट उद्देशाने हात पकडून ओढला व शिवीगाळ करत विनयभंग केला. विटकरीने घरातील खिडक्यांची काच फोडली. परिवाराला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. आरडाओरड केली असता ते पळून गेले. या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संगितानेही तक्रार दिली असून, तक्रारीनुसार तिचे लग्न 2010 मध्ये राहुल सरसरेशी झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. त्या 3 ते 4 वर्षांपासून माहेरी लोणी लव्हाळा येथे राहत होत्या. मात्र आपल्या पतीचे लग्न लावून दिल्याचे कळताच तिने भाऊ व आईसह नणंदकडे विचारणा करण्यासाठी आली असता नणंदेचा पती लक्ष्मण शिराळे व त्यांची पत्नी कामिना शिराळे यांनी शिविगाळ करत चापट बुक्क्यांनी मारहाण केली. नणंदेच्या पतीने आपल्या पतीचे लग्न लावून दिले, असा आरोप संगिताने केला आहे. घरातून निघून जा नाही तर जीवे मारून टाकू, अशी धमकी संगिताला दिल्याने तिने तक्रारीत म्हटले आहे. यावरून शहर पोलिसांनी दुसर्‍या गटातील लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पो.हे.काँ.प्रकाश बाजड करत आहे.