पतीच्या छळाला कंटाळून २० वर्षीय तरुण विवाहितेने घेतली विहिरीत उडी; जळगाव जामोद तालुक्यातील खळबळजनक घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी भिंगारा (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली. शंतूबाई राजू डावर (रा. भिंगारा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तिचा भाऊ शिवलाल चव्हाण (रा. भिंगारा) याने याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार …
 
पतीच्या छळाला कंटाळून २० वर्षीय तरुण विवाहितेने घेतली विहिरीत उडी; जळगाव जामोद तालुक्यातील खळबळजनक घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी भिंगारा (ता. जळगाव जामोद) येथे समोर आली. शंतूबाई राजू डावर (रा. भिंगारा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

तिचा भाऊ शिवलाल चव्हाण (रा. भिंगारा) याने याप्रकरणी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शंतूबाईचे गावातीलच राजू डावरसोबत (२५) लग्‍न झाले होते. मात्र तो तिला त्रास द्यायचा, शारीरिक व मानसिक छळ करायचा. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याचे शिवलालने तक्रारीत म्हटले आहे. त्‍यावरून राजूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

११ सप्टेंबरच्या रात्रीपासूनच शंतूबाई घरातून बेपत्ता होती. काल गावातील ग्रामपंचायती शेजारी असलेल्या विहिरीतच मृतदेह आढळला. जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. मृतदेह कुजलेला असल्याने जागेवरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक सागर भास्कर व प्रेमसिंग पवार करत आहेत.