पतीचे बाहेर अफेअर, पत्‍नीला ४ वर्षांपासून त्रास!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बाहेर अफेअर असल्याने पत्नीचा चार वर्षांपासून छळ मांडला. नातेवाइकांत याची चर्चा झाल्याने पुन्हा पत्नीला जबाबदार धरून बेदम मारहाण केली. जळगाव जामोद पोलिसांनी पिंपळगाव राजा येथील या पतीविरुद्ध काल, २३ जूनला गुन्हा दाखल केला आहे. नजराना बी शेख सादीक (२८, रा. उर्दू शाळेजवळ, पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) हिने बहिणीसह …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बाहेर अफेअर असल्याने पत्‍नीचा चार वर्षांपासून छळ मांडला. नातेवाइकांत याची चर्चा झाल्‍याने पुन्‍हा पत्‍नीला जबाबदार धरून बेदम मारहाण केली. जळगाव जामोद पोलिसांनी पिंपळगाव राजा येथील या पतीविरुद्ध काल, २३ जूनला गुन्‍हा दाखल केला आहे.

नजराना बी शेख सादीक (२८, रा. उर्दू शाळेजवळ, पिंपळगाव काळे, ता. जळगाव जामोद) हिने बहिणीसह जळगाव जामोद पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीत म्‍हटले आहे, की आम्‍हा दोघी बहिणींना एकाच घरात दिलेले आहे. पती शेख आसीफ यांचे बाहेर कुठेतरी लफडे सुरू आहे. त्यामुळे ते मागील ४ वर्षांपासून मला त्रास देत आहेत. नेहमी मारहाण, शिविगाळ करून तू घरात राहू नको. तू मला पाहिजेत नाही, असे म्हणतो. त्‍यांची तक्रार मागील वर्षी पोलीस स्टेशनलाही केली होती. पण त्‍यांच्‍या वागण्यात काहीच फरक पडला नाही. काल, २३ जूनला दुपारी ४ च्‍या सुमारास पती शेख आसीफ पुन्‍हा शिविगाळ करू लागला.

“तू माझी बदनामी नातेवाइकांत केली आहे. तू तुझ्या नातेवाइकांना इथे बोलाव आणि माफी मागायला सांग’, असे तो म्‍हणाला. तेव्हा ईद झाल्यावर मी त्यांना बोलावते व तुमची माफी मागायला सांगते, असे ती म्‍हणाले. मात्र तरीही तो ऐकण्याच्या मनःस्‍थितीत नव्‍हता त्‍याने लोटपाट करून डाव्‍या पायाच्‍या गुडघ्याजवळ दगड मारला. त्यामुळे मी जखमी झाले. माझी मोठी बहीण अफसाना सोडविण्यासाठी आली असता तिलाही त्‍याने लोखंडी पाईप मारला. दीर, दुसरी जेठानी यांनी मला पतीच्‍या तावडीतून सोडविले, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी शेख आसिफविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.