पतीसोबत फोनवर वाद झाला अन् तिने घर सोडले…!

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीसोबत वारंवार वाद होत असल्याने माहेरी निघून आलेली विवाहिता माहेरातून गायब झाली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी तिचा पतीसोबत फोनवर वाद झाला होता. ही घटना मलकापूर शहरातील एकतानगरात समोर आली असून, बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे. विनायक विश्वनाथ वाघमारे यांनी …
 

मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पतीसोबत वारंवार वाद होत असल्याने माहेरी निघून आलेली विवाहिता माहेरातून गायब झाली आहे. बेपत्ता होण्यापूर्वी तिचा पतीसोबत फोनवर वाद झाला होता. ही घटना मलकापूर शहरातील एकतानगरात समोर आली असून, बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने मलकापूर शहर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिली आहे.

विनायक विश्‍वनाथ वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की त्यांची मुलगी मयुरी भीमराज इंगळे (25) हिचे शहरातील भीमराज इंगळे यांच्यासोबत 2019 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर दोघांत वाद होत असल्याने मयुरी माहेरी राहण्यास आली होती. 2 जानेवारीला पती भीमराजसोबत दुपारी 3 च्या सुमारास तिचा फोनवर वाद झाला. या वादामुळे तिने रागाच्या भरात घर सोडले. जातानाही बाळालाही सोबत नेले नाही. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे. रंग गोरा, सडपातळ बांधा, उंची साडेपाच इंच, पांढरा पंजाबी ड्रेस, त्यावर लाल स्वेटर, कपाळावर डाव्या बाजूला तीळ असे या विवाहितेचे वर्णन आहे. कुणाला ती आढळल्या मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.