पती-पत्‍नीत मध्यरात्री राडा!; दगड’वारा’त दोघेही घायाळ!; जळगाव जामोद तालुक्‍यातील घटना

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती-पत्नीचे भांडण जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. भांडणही साधेसुधे नाही. एकमेकांवर पार दगडाचे घाव आहेत. यात पती-पत्नी आणि त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. ही घटना वाडी खुर्द येथील गणेशनगरात (ता. जळगाव जामोद) आज, 21 मे राजी पहाटे दोनच्या सुमारास (मध्यरात्री) घडली. पत्नी सौ. सोनाली मधुकर झाटे (35) हिने …
 

जळगाव जामोद (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पती-पत्‍नीचे भांडण जळगाव जामोद पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. भांडणही साधेसुधे नाही. एकमेकांवर पार दगडाचे घाव आहेत. यात पती-पत्‍नी आणि त्‍यांचा मुलगाही जखमी झाला आहे. ही घटना वाडी खुर्द येथील गणेशनगरात (ता. जळगाव जामोद) आज, 21 मे राजी पहाटे दोनच्‍या सुमारास (मध्यरात्री) घडली.

पत्‍नी सौ. सोनाली मधुकर झाटे (35) हिने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्‍या पती मधुकर देविदास झाटे, मुलगा विशाल व मुलगी वैष्णवीसोबत राहतात. आज पहाटे दोनला पती मधुकरने माहेरवरून एक लाख रुपये घेऊन ये म्‍हणून शिविगाळ करून पोटात लाथा बुक्‍क्यांनी मारहाण केली. मुलगा विशाल झोपेतून जागा झाला. तो भांडण आवरण्यास आला असता त्‍यालाही मारहाण केली. नंतर सोनाली आणि मुलगा-मुलीला मधुकरने घराबाहेर काढून दिले. त्‍यानंतर पुन्‍हा धावत मागे येऊन रस्त्यावरील दगड हातात घेऊन मारला. मुलालाही मारहाण केली. पती मधुकरनेही तक्रार दिली असून, त्‍याने तक्रारीत म्‍हटले आहे की मध्यरात्री भूक लागली म्‍हणून वाढून दे असे म्‍हणालो तर पत्‍नी सोनाली म्‍हणाली की मला झोप लागत आहे. मी वाढत नाही. तुला वाढून द्यावेच लागेल असे तिला म्हणालो तर तिने घराच्‍या बाहेर जाऊन दगड घेऊन आली व डोक्यात मारला. त्‍यामुळे डोके फुटले. मुलगा विशालनेही मारहाण केल्याचे तक्रारीत म्‍हटले आहे. पोलिसांनी या दोन्‍ही तक्रारींवरून पती-पत्‍नी दोघांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.