पत्नीने लिव्हर दान करूनही वाचवू शकली नाही पतीचे प्राण! चिखली पोलीस ठाण्यात होते कार्यरत

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पती लिव्हर विकाराने त्रस्त. जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या पतीला वाचवायचेच हा निर्धार तिने केलेला… त्यासाठी तिचा मोठा आटापिटा सुरू होता… केवळ प्रयत्न करून न थांबता आपले लिव्हरही तिने पतीला दिले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया अयशस्वी ठरवून पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परमेश्वर वामन आढाव (३३) चिखली …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पती लिव्हर विकाराने त्रस्त. जीवन मरणाची लढाई लढणाऱ्या पतीला वाचवायचेच हा निर्धार तिने केलेला… त्‍यासाठी तिचा मोठा आटापिटा सुरू होता… केवळ प्रयत्‍न करून न थांबता आपले लिव्हरही तिने पतीला दिले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लिव्हर प्रत्यारोपणाची शस्‍त्रक्रिया अयशस्वी ठरवून पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

परमेश्वर वामन आढाव (३३) चिखली पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मूळचे जानेफळ येथील असणारे श्री. आढाव यांना लिव्हरचा आजार होता. त्यामुळे लिव्हर प्रत्यारोपण हाच एकमेव उपाय त्यांना वाचवू शकत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यासाठी त्यांच्या पत्नी मनिषा (२९) यांनी स्वतःचे लिव्हर पतीला देण्याची तयारी दर्शविली होती. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये १० जुलैला श्री. आढाव यांच्यावर लिव्हर प्रत्यारोपणाची शस्‍त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचेही जाणवत होते. मात्र १३ जुलैच्या रात्रीपासून त्यांचे शरीर उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. काल १४ जुलै रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांचे पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. श्री आढाव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच आढाव यांनी कर्तव्य निभावलेल्या साखरखेर्डा आणि चिखली पोलीस ठाण्यात शोककळा पसरली.