पत्रकाराला लोटपोट : जिल्हाभरातील पत्रकार एकवटले!; ठिकठिकाणी निवेदने, SP म्‍हणाले, यापुढे असे होणार नाही याची काळजी घेऊ!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १४ सप्टेंबर रोजी एलसीबीने चिखली येथील खामगाव चौफुलीजवळ अवैध गांजा तस्करी करणारा ट्रक पकडला होता. यावेळी तिथे वृत्तसंकलनासाठी गेलेले पत्रकार समाधान गाडेकर यांना पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी लोटपाट करून मारहाण केली होती. या घटनेविरोधात जिल्हाभरातील पत्रकार संतप्त झाले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी पत्रकारांनी या घटनेचा निषेध करून स्थानिक अधिकाऱ्यांकडे मारहाण करणाऱ्या पोलीस …
 
पत्रकाराला लोटपोट : जिल्हाभरातील पत्रकार एकवटले!; ठिकठिकाणी निवेदने, SP म्‍हणाले, यापुढे असे होणार नाही याची काळजी घेऊ!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १४ सप्टेंबर रोजी एलसीबीने चिखली येथील खामगाव चौफुलीजवळ अवैध गांजा तस्करी करणारा ट्रक पकडला होता. यावेळी तिथे वृत्तसंकलनासाठी गेलेले पत्रकार समाधान गाडेकर यांना पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी लोटपाट करून मारहाण केली होती. या घटनेविरोधात जिल्हाभरातील पत्रकार संतप्त झाले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी पत्रकारांनी या घटनेचा निषेध करून स्थानिक अधिकाऱ्यांकडे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

  • बुलडाणा येथे पत्रकार राजेंद्र काळे, अरुण जैन, चंद्रकांत बर्दे, सुभाष लहाने, भानुदास लकडे, सुनील तिजारे, संजय काळे, विष्णू अवचार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची भेट घेतली. पत्रकारांनी घडलेली घटना जिल्हा पोलीस अधीक्षकांना अवगत करून दिली. तेव्हा यापुढे असे प्रकार होणार नाहीत अशी काळजी घेऊ. प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, असा शब्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिला.
  • चिखली येथील पत्रकारांनी तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी मनोहरराव गायकवाड, इफ्‍तेखार खान, योगेश शर्मा, रवींद्र फोलाने, संतोष लोखंडे, गणेश सोळंकी, कैलास अवचार, कैलास शर्मा, रेणुकादास मुळे, कैलास गाडेकर, संजय खेडेकर, महेश गोंधणे, रमाकांत कपूर, भिकू लोळगे, कमलाकर खेडेकर, सत्य कुटे, तौफिक अहेमद, नितीन फुलझाडे, रमीज रजा, इम्रान शहा, छोटू कांबळे, गिरीश शिरभाते, राजेंद्र सुरडकर उपस्थित होते.
  • चिखली तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांची भेट घेऊन घटनेचा निषेध नोंदवला. यावेळी पत्रकार सुधीर चेके, उद्धव थुट्टे, अमोल जोशी, पवन शिराळे, प्रफुल्ल देशमुख, संजय सुराणा, अनुप महाजन, प्रकाश मेहेत्रे, मंगेश पळसकर, गोपाल तुपकर, समाधान गाडेकर, युसूफ शेख, पवन लड्डा, विनोद खरे, संजय भालेराव, ओमप्रकाश खत्री, बळीराम गुंजाळ, काशिनाथ शेळके, शिवदास जाधव, आकाश डोणगावकर, तनझीम हुसैन, समीर शेख उपस्थित होते.
  • अंढेरा येथे ठाणेदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी पत्रकार प्रताप मोरे, ज्ञानेश्वर म्हस्के, स्वप्नील शिंदे, शेख कौसर, राजेंद्र घुबे उपस्थित होते.
  • सिंदखेडराजा येथे तहसीलदारांना निवेदन देऊन मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी गजानन काळुसे, बाळासाहेब भोसले, बाजीराव वाघ, नंदू वाघमारे, बुद्ध चौधरी, छगन झोरे, मुकुंद पाठक, दीपक नागरे, समीर कुरेशी, शेख फिरोज, भगवान नागरे, अफरोज पठाण, गजानन मेहेत्रे, अशोक इंगळे, अमोल भट, रवी ढवळे, गुणवंत देशमुख, विलास झोरे, देविदास पांचाळ, भगवान साळवे, अशोक सोनुने, विठ्ठल देशमुख, भगवान देशमुख, चंद्रकांत कुलकर्णी, लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते.
  • मेहकर तालुका पत्रकार संघातर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जुगराज पठ्ठे, रफिक कुरेशी, सिद्धेश्वर पवार, प्रवीण गायकवाड, संतोष मलोसे, संतोष अवसरमोल, नीलेश नाहटा, भरत सरडा, फिरोज शहा, विवेक देशमुख, ओमप्रकाश देवकर, युनूस बागवान, ज्ञानेश्वर इंगळे, उद्धव फंगाळ, अमर राऊत, प्रदीप जोशी, निसार अन्सारी, सुनील मोरे, सादिक कुरेशी, संदीप ढोरे, मुन्ना काळे, श्याम काळे, रवींद्र वाघ, गजानन देशमुख, सुभाष नरवाडे उपस्थित होते.