पत्रकार परिषदेत भाजप नेत्याला शिविगाळ; भाजप नेत्याने गाठले पोलीस ठाणे; शेगाव येथील प्रकार

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील व्यापारी संजय टीबडेवाल यांनी काल, ३० ऑगस्टला पत्रकार परिषद घेतली. आपल्या खासगी जागेत नगरपालिकेने खोदकाम करून मुरूम टाकला, असा त्यांचा आरोप होता. नगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता असल्याने सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर त्यांचा रोख होता. पत्रकार परिषदेदरम्यान भाजप गटनेते तथा माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह …
 
पत्रकार परिषदेत भाजप नेत्याला शिविगाळ; भाजप नेत्याने गाठले पोलीस ठाणे; शेगाव येथील प्रकार

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेगाव शहरातील व्यापारी संजय टीबडेवाल यांनी काल, ३० ऑगस्‍टला पत्रकार परिषद घेतली. आपल्या खासगी जागेत नगरपालिकेने खोदकाम करून मुरूम टाकला, असा त्यांचा आरोप होता. नगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता असल्याने सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर त्यांचा रोख होता. पत्रकार परिषदेदरम्यान भाजप गटनेते तथा माजी नगराध्यक्ष शरद अग्रवाल यांच्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह विधान केले. शरद अग्रवाल यांना टीबडेवाल यांनी हीन संबोधले. त्यामुळे संतप्त झालेल्या अग्रवाल यांनी आज, ३१ ऑगस्‍टला शेगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरून संजय टीबडेवाल यांच्याविरुद्ध शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.