पत्‍नीच्‍या खुनाने हादरले नारायणपूर!; नांदुरा तालुक्यात खळबळ, चार चिमुकल्यांवर आघात!

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील निमगावला लागून असलेल्या नारायणपूर येथे पतीने पत्नीचा खून केला. ही घटना आज, 28 मे रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास घडली. वर्षा विष्णू खैरे (31) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला राहत्या घरातच पतीने जड वस्तू डोक्याला मारून खून केला आहे. विष्णू खैरे (35) असे …
 

नांदुरा ( प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा तालुक्यातील निमगावला लागून असलेल्या नारायणपूर येथे पतीने पत्‍नीचा खून केला. ही घटना आज, 28 मे रोजी संध्याकाळी 6 च्‍या सुमारास घडली.

वर्षा विष्णू खैरे (31)  असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिला राहत्या घरातच पतीने जड वस्तू डोक्याला मारून खून केला आहे. विष्णू खैरे (35) असे आरोपी पतीचे नाव आहे.  त्‍यांना 8 वर्षीय मुलगा, 6 वर्षीय मुलगा, 4 वर्षीय मुलगा व 10 महिन्यांची मुलगी आहे. या घटनेमुळे गावाला धक्का बसला आहे.  घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुरेश नाईकनवरे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्‍यांनी पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. तपास नांदुरा पोलीस करीत आहेत. खुनाचे कारण वृत्त लिहीपर्यंत समोर आले नव्हते.