पत्‍नीच्‍या पर्समधून काढत होता पैसे, तिने रोखले तर राफ्‍टरने झोडपले!; खामगाव शहरातील घटना

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः दारू पिऊन आल्यानंतर पत्नीच्या पर्समधील पैसे काढत असताना तिने विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या पतीने तिला मारहाण केली. तिने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून पती व सासूविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना खामगाव शहरातील रावण टेकडी भागात २१ जूनच्या दुपारी १२ च्या सुमारास घडली. सौ. अश्लेषा श्रीकृष्ण कासारकर …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दारू पिऊन आल्यानंतर पत्‍नीच्‍या पर्समधील पैसे काढत असताना तिने विरोध केला. त्‍यामुळे संतापलेल्या पतीने तिला मारहाण केली. तिने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून पती व सासूविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही घटना खामगाव शहरातील रावण टेकडी भागात २१ जूनच्‍या दुपारी १२ च्‍या सुमारास घडली.

सौ. अश्लेषा श्रीकृष्ण कासारकर (२७) या विवाहितेने तक्रार दिली, की तिचा पती श्रीकृष्ण चंद्रकांत कासारकर काल दुपारी मद्यपान करून घरी आला व त्यांच्या पर्समधील पैसे काढू लागला. अश्लेषाने त्याच्याकडून पर्स हिसकावून घेतली. त्‍यामुळे संतापून श्रीकृष्णने तिला हाता-पायावर लाकडी राफ्टरने मारून जखमी केले. तिला अश्लील शिविगाळ केली. सासू श्रीमती शशिकला चंद्रकांत कासारकर यांनीसुद्धा तिला चापटांनी मारहाण करून अश्लील शिवीगाळ केली. दोघा मायलेकांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असे तिने तक्रारीत म्‍हटले आहे. कालच तिने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून पती व सासूविरुद्ध तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपास पोहेकाँ निलसिंग चव्हाण करत आहेत.