पत्‍नीच्‍या पोटात चाकू खुपसायला होते “हे’ क्षुल्लक कारण!; रायपूरच्‍या घटनेतील पती-पत्‍नी आता धोक्‍याबाहेर!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)ः पत्नीच्या पोटात चाकू खुपसल्यानंतर स्वतःवरही सपासप वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रायपूर येथे १२ जुलैला सायंकाळी घडली होती. याप्रकरणी अकोला येथे उपचार घेत असलेल्या पत्नीच्या जबाबावरून तिचा पती मो. समद मो. सत्तार (३०, रा. रायपूर, ता. बुलडाणा) याच्या विरोधात रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ जुलैला सायंकाळी …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः पत्नीच्या पोटात चाकू खुपसल्यानंतर स्वतःवरही सपासप वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रायपूर येथे १२ जुलैला सायंकाळी घडली होती. याप्रकरणी अकोला येथे उपचार घेत असलेल्या पत्नीच्या जबाबावरून तिचा पती मो. समद मो. सत्तार (३०, रा. रायपूर, ता. बुलडाणा) याच्या विरोधात रायपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १२ जुलैला सायंकाळी सहाला लवकर जेवायला वाढले नाही म्हणून पतीने चाकूहल्ला केल्‍याचे सायमा बी मो. समद (२८) हिने पोलिसांना सांगितले. घटनेनंतर पती-पत्नीला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पत्नीला अकोला तर पतीला औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. सध्या दोघांवरही उपचार सुरू असून, प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.