पत्‍नीला भोसकून पतीचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न!; रायपूर येथील थरार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूहल्ला केला. नंतर स्वतःलाही भोसकून घेतले. ही घटना आज, १२ जुलैला सायंकाळी सहाच्या सुमारास रायपूर (ता. बुलडाणा) येथे घडली. दोघांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे. रायपूर येथील मो. समद मो. सत्तार (३०) याचा कौटुंबिक …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूहल्ला केला. नंतर स्वतःलाही भोसकून घेतले. ही घटना आज, १२ जुलैला सायंकाळी सहाच्‍या सुमारास रायपूर (ता. बुलडाणा) येथे घडली. दोघांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्‍यांना अकोला येथे हलविण्यात आले आहे.

रायपूर येथील मो. समद मो. सत्तार (३०) याचा कौटुंबिक कारणावरून पत्नी सायमाबी मो. समद (२८) हिच्‍याशी वाद झाला. वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात मो. समदने पत्नीवर चाकूने सपासप वार केले. त्यानंतर स्वत:च्या पोटात चाकूने वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड एेकून शेजारच्यांनी धाव घेत दोघांना रायपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तिथून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर अकोला येथे हलविण्यात आले असून, दोघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.