पती-पत्नीसह चिमुकली वाहून गेली का?; माहिती दारूड्याने दिली, पण १ टक्‍का शक्‍यता गृहित धरून ग्रामस्‍थांनी शोधकार्य राबवले!!; उद्याही शोध घेणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गाव वडाळी (ता. मेहकर)… वेळ आज ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी सव्वा सहाची… रिपरिप कोसळणारा पाऊस… गावाजवळून जाणाऱ्या वाटसरूने गावात एक धक्कादायक माहिती दिली… अन संपूर्ण गावच हादरले… तातडीने सर्वांनी नदीचा काठ गाठला… “शाईन मोटारसायकलवरील दोघे पती- पत्नी अन् एक चिमुकली मुलगी असे तिघे जण गाडीसह वाहून गेल्याचे मी डोळ्याने बघितले’, अशी …
 
पती-पत्नीसह चिमुकली वाहून गेली का?; माहिती दारूड्याने दिली, पण १ टक्‍का शक्‍यता गृहित धरून ग्रामस्‍थांनी शोधकार्य राबवले!!; उद्याही शोध घेणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गाव वडाळी (ता. मेहकर)… वेळ आज ३१ ऑगस्‍टच्‍या संध्याकाळी सव्वा सहाची… रिपरिप कोसळणारा पाऊस… गावाजवळून जाणाऱ्या वाटसरूने गावात एक धक्कादायक माहिती दिली… अन संपूर्ण गावच हादरले… तातडीने सर्वांनी नदीचा काठ गाठला… “शाईन मोटारसायकलवरील दोघे पती- पत्नी अन्‌ एक चिमुकली मुलगी असे तिघे जण गाडीसह वाहून गेल्याचे मी डोळ्याने बघितले’, अशी माहिती त्‍या पातूर तालुक्‍यातील रहिवासी असलेल्या व्‍यक्‍तीने ग्रामस्‍थांना दिली होती.

वडाळा ते मांडवा दरम्यान असलेल्या नदीला सायंकाळी पूर आला होता. माहिती मिळताच गावातील शेकडो लोकांनी तातडीने नदीत शोधकार्य सुरू केले. मात्र कुणीही सापडले नाही. अंधार पडल्याने शोधकार्य थांबवण्यात आले. ज्याने ही बातमी गावकऱ्यांना सांगितली त्याने मद्यप्राशन केलेले होते, असेही गावकऱ्यांनी सांगितले. त्‍यामुळे त्‍याने दिलेल्या माहितीत किती सत्‍यता असेल यावर शंकाच आहे. तरीही ग्रामस्‍थांनी काळजीने शोध घेतला. जानेफळ पोलिसांशी याबाबत संपर्क साधला असता माहिती देणाऱ्याचा शोध सुरू असल्याचे ठाणेदार राहुल गोंधे यांनी सांगितले. उद्या सकाळी ग्रामस्थ व पोलीस पुन्हा शोध घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र सध्यातरी तिघे जण खरंच वाहून गेले का, याबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.