परप्रांतीय मजुरांमुळेच वाढतोय महाराष्ट्रातील कोरोना -राज ठाकरे

लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्याची मागणी मुंबई : देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून. सर्वाधिक वाढ ही महाराष्ट्रात दिसून येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढ ही प्रचंड मोठी आहे. पण या वाढत्या रुग्णसंख्येला परप्रांतीय मजूरच जबाबदार आहेत,असे जोरदार टीकास्त्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोडले आहे.कोरोनाच्या सद्यस्थितीतबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे …
 

लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्याची मागणी

मुंबई : देशात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून. सर्वाधिक वाढ ही महाराष्ट्रात दिसून येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील रुग्णवाढ ही प्रचंड मोठी आहे. पण या वाढत्या रुग्णसंख्येला परप्रांतीय मजूरच जबाबदार आहेत,असे जोरदार टीकास्त्र मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोडले आहे.
कोरोनाच्या सद्यस्थितीतबाबत राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ऑनलाईन संवाद झाला. त्याची माहिती देण्यासाठी राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य असल्याने बाहेरून येणार्‍या लोकांची संख्या जास्त आहे. त्यांच्यापैकी कुणी बाधित निघाले तर त्यांची मोजणी ही त्यांच्या राज्यात नव्हे तर महाराष्ट्रात होते. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोबाधितांची रुग्णसंख्या जास्त आहे. पश्चिम बंगाल वगैरे इतर ठिकाणी कोरोनाची लाट असल्याचे ऐकिवात नाही. मागच्या वर्षी कोरोना व लॉकडाऊनमुळे परप्रांतीय मजूर जेव्हा मुंबई व महाराष्ट्र सोडून परतले. त्याचवेळी सरकारला सल्ला दिला होता की, हे परत येतील तेव्हा त्यांची रितसर नोंदणी करा, त्यांच्या कोरोना चाचण्या करा. पण सरकारने ते केले नाही. किमान यावर्षी तरी ते व्हायला हवे. आठवड्यातून दोन ते तीन दिवस दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी. तसेच लॉकडाऊनच्या काळातील वीजबिल सरकारने माफ करावे, अशी मागणीही ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे.