पर्यटकांसमोर लोणारची शोभा करणार्‍या रस्त्याचे काम अखेर सुरू

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पर्यटकांसमोर शहराचे चुकीचे चित्र निर्माण करणार्या प्रताप चौक ते जय मंदिर रस्त्याचे काम अखेर सुरू झाले आहे. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती.जगप्रसिद्ध लोणारमध्ये पर्यटकांची कायम वर्दळ असते. मात्र शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्यांच्यासमोर शहराची शोभा होते. प्रताप चौक ते जय मंदिर हा रस्ता दैत्यसुदन मंदिराकडे जातो.या रस्त्यावर नेहमी पर्यटकांची …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पर्यटकांसमोर शहराचे चुकीचे चित्र निर्माण करणार्‍या प्रताप चौक ते जय मंदिर रस्त्याचे काम अखेर सुरू झाले आहे. या रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती.
जगप्रसिद्ध लोणारमध्ये पर्यटकांची कायम वर्दळ असते. मात्र शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्यांच्यासमोर शहराची शोभा होते. प्रताप चौक ते जय मंदिर हा रस्ता दैत्यसुदन मंदिराकडे जातो.या रस्त्यावर नेहमी पर्यटकांची वर्दळ सुरू असते. मागील काही वर्षांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. नाल्या फुटल्याने आजूबाजूचे सांडपाणी रस्त्यावर येते. त्यामुळे पर्यटकांत लोणार शहराबद्दल चुकीचा संदेश जातो. काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या उदासिनतेमुळे प्रलंबित रस्त्याचा मार्ग अखेर नगरसेविका सौ. रेखा लुनीया यांनी नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांच्या सहकार्यामुळे मार्गी लावला आहे. प्रभाग चारमध्ये मागील दोन वर्षांपासून रस्ते कामासाठी 84 लाख रुपये मंजूर झाले होते. परंतु निधीअभावी व नंतर कोरोनामुळे विकासकामे रखडली होती. नगराध्यक्षा पूनम पाटोळे यांनी स्वच्छ व सुंदर लोणार शहर बनविण्याचे जे स्वप्न बघितले होते ते आता हळूहळू पूर्ण होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक वॉर्डांतील प्राथमिक समस्येचे निराकरण झाले आहे तर काही कामे सुरू आहेत.

कोरोनामुळे मतदारांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी थोडा वेळ लागला. पण आता वॉर्डाच्या सर्वांगिण विकासाकडे विशेष लक्ष देऊन समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन.

नगरसेविका सौ. रेखा लुनीया

नागरिकांनी लोणार शहराच्या विकासाठी माझ्यावर विश्‍वास ठेवला आहे. मी शहराचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. शहराला येणार्‍या काळात सुंदर बनवायचे आहे.

नगराध्यक्षा पूनम पाटोळे