पर्यावरण संवर्धनासाठी सरसावली सावखेड तेजननगरी!

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजनचे उपसरपंच भगवानराव जायभाये व सेवानिवृत्त भारतीय सैनिक प्रल्हादराव जायभाये यांचे वडील स्व. कारभारी संतूजी जायभाये यांचे १० जुलैला वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यविधीनंतर विधिवत तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन नदी, तलाव धरण किंवा धार्मिक स्थळी जलाशयात केले जाते. परंतु जायभाये परिवार, परिवारातील प्रल्हादराव जायभाये, भगवानराव …
 

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजनचे उपसरपंच भगवानराव जायभाये व सेवानिवृत्त भारतीय सैनिक प्रल्हादराव जायभाये यांचे वडील स्व. कारभारी संतूजी जायभाये यांचे १० जुलैला वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यविधीनंतर विधिवत तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जन नदी, तलाव धरण किंवा धार्मिक स्थळी जलाशयात केले जाते. परंतु जायभाये परिवार, परिवारातील प्रल्हादराव जायभाये, भगवानराव जायभाये, प्रदीप जायभाये, सावखेड तेजनचे सरपंच संदीप नागरे, शिवसेना नेते विलास विघ्ने, वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी परंपरेला फाटा देऊन कारभारी जायभाये यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्मशानभूमीत खड्डे खोदून त्यात रक्षाविसर्जन केले. त्यात एकूण ३६ वृक्ष लावून त्यांच्या संगोपनाचा संकल्प केला. या निमित्ताने स्मशानभूमीत कडुलिंब,करंज,अशोका,बेल, चाफा,पाम,जास्वंद कन्हेर, पारिजातक आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले.