पवार यांच्या सूचनेवर काय म्हणाले फडणवीस?

मुंबई ः कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेते पाहणीसाठी जातात. त्यात अधिकारी गुंतून पडतात. मदत व अन्य कामांकडं त्यामुळं दुर्लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर नेत्यांनी प्रसंगावधान राखून दाैरै टाळले पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ही सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मान्य असली, तरी त्यांनी आपण दाैरे करणार असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला …
 

मुंबई ः कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेते पाहणीसाठी जातात. त्यात अधिकारी गुंतून पडतात. मदत व अन्य कामांकडं त्यामुळं दुर्लक्ष होतं. या पार्श्वभूमीवर नेत्यांनी प्रसंगावधान राखून दाैरै टाळले पाहिजेत, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ही सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मान्य असली, तरी त्यांनी आपण दाैरे करणार असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला दाैरे करणं का आवश्यक आहे, हे ही त्यांनी सांगितलं.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतकार्य महत्त्वाचं असतं. नेत्यांच्या दाैऱ्यामुळं यंत्रणा त्यांच्यामागं फिरते, असं निदर्शनास आणून ते योग्य नसल्याचं मत पवार यांनी मांडलं होतं. संबंधित भागाशी ज्यांचा दैनंदिन संबंध नाही, त्यांनी दौरा टाळावा, असं ते म्हणाले होते. याबाबत फडणवीस यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी पवार यांचा सल्ला योग्य असल्याचं म्हटलं. पवार यांच्या आवाहनाचा अर्थ समजून घेतला पाहिजे, असं सांगून फडणवीस म्हणाले, की कोणाच्याही दौऱ्याचा ताण शासकीय यंत्रणेवर येता कामा नये. मी विरोधी पक्षनेता आहे. माझ्या दिमतीला शासकीय यंत्रणा नसते. सरकारनं तसा जीआर काढला आहे. असे असलं तरी आमचे दौरे आवश्यक आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणा जागी होते. यंत्रणा कामाला लागते. लोकांचा आक्रोश समजून घेता येतो. सरकारला तो समजावून सांगता येतो. रेस्क्यू ऑपरेशन किंवा मदतकार्य दाैऱ्यामुळं थांबता कामा नये, असा पवार यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.