पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा बदलल्या; इर्मजन्सीसाठी 24 तास सेवा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पशुसंवर्धन विभागामार्फत पशुच्या वैद्यकीय सेवेकरिता जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. त्यात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये व फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समावेश आहे. आता या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांची सोमवार ते शुक्रवार कामकाजाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4.30 पर्यंत, …
 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पशुसंवर्धन विभागामार्फत पशुच्या वैद्यकीय सेवेकरिता जिल्ह्यात पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. त्यात पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी 1 व श्रेणी 2, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये व फिरता पशुवैद्यकीय दवाखाने यांचा समावेश आहे. आता या सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांची सोमवार ते शुक्रवार कामकाजाची वेळ सकाळी 9 ते दुपारी 4.30 पर्यंत, जेवणाची सुटी दुपारी 1 ते 1.30 वाजेपर्यंत राहणार आहे. तसेच शनिवार रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत कामकाजाची वेळ असणार आहे. पशुपालकांना आकस्मिक प्रसंगी 24 तास सेवा उपलब्ध असणार आहे. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या वेळांची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. जी. बोरकर यांनी केले आहे.