पहाटे तीनला खडकन वाजले म्‍हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’!; चिखली शहरातील घटना

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहाटेचे तीन वाजलेले..सारेच गाढ झोपेत… खडकन काहीतरी वाजले म्हणून त्याची आई उठली… कपाट उघडण्याचा आवाज झाल्याने तिने पाहिले तर कपाटाजवळ फुलबाह्याचे शर्ट, भुरकट कलरची जीन्स पँट घातलेला चोर पाठमोरा उभा असलेला दिसला.. तिने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे चोर पळून गेला.. पाठलाग करूनही तो हाती लागला. सोबत त्याने दोन मोबाइल आणि …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहाटेचे तीन वाजलेले..सारेच गाढ झोपेत… खडकन काहीतरी वाजले म्‍हणून त्‍याची आई उठली… कपाट उघडण्याचा आवाज झाल्याने तिने पाहिले तर कपाटाजवळ फुलबाह्याचे शर्ट, भुरकट कलरची जीन्स पँट घातलेला चोर पाठमोरा उभा असलेला दिसला.. तिने आरडाओरड सुरू केली. त्‍यामुळे चोर पळून गेला.. पाठलाग करूनही तो हाती लागला. सोबत त्‍याने दोन मोबाइल आणि रोख ७ हजार रुपये चोरून नेले. ही घटना चिखली शहरातील गजानननगरात आज, २४ जुलैला पहाटे समोर आली.

राहूल रामदास वरवंडे (३०, रा. गजानननगर चिखली) यांनी या प्रकरणात तक्रार दिली. ते पत्नी सौ. पायल, आई सुनिता वरवंडे, मावशी कांताबाई व आजी शेवंताबाई यांच्‍यासह राहतात. ते ॲपेचालक आहेत. काल रात्री जेवण करून सर्व झोपी गेले. पहाटे तीनला सुनिता वरवंडे यांना घरात कपाट उघडण्याचा आवाज आल्याने त्‍या जागल्या. त्‍यांनी पाहिले की कपाटाजवळ चोर पाठमोरा उभा आहे. त्‍यांनी घाबरून राहुलला आवाज दिला. त्‍यामुळे चोरट्याने पळ काढला. राहुलने त्‍याचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन तो पळून गेला. चोरट्याने आजीच्‍या पिशवीतील ७ हजार रुपये, रेडमी कंपनीचा मोबाइल (किंमत ३ हजार रुपये), आयटेल कंपनीचा साधा मोबाइल (किंमत १ हजार रुपये) चोरून नेल्याचे दिसून आले. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला असून, तपास सुरू आहे.