पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहाटे फिरायला गेलेली महिला बेपत्ता झाली… नातेवाईकांनी तिचा शोध घेतला अन् शेवटी मृतदेहच हाती आला! बुलडाणा तालुक्यातील धाड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धामणगाव धाड येथे आज, १६ ऑक्टोबरला ही दुर्दैवी घटना घडली अन् गाव परिसरात एकच खळबळ उडाली. धामणगाव धाड येथील सुमनबाई रमेश शिनकर (४५) ही महिला आज …
 
पहाटे फिरायला गेलेल्या महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत!; बुलडाणा तालुक्‍यातील घटना

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहाटे फिरायला गेलेली महिला बेपत्ता झाली… नातेवाईकांनी तिचा शोध घेतला अन्‌ शेवटी मृतदेहच हाती आला! बुलडाणा तालुक्यातील धाड पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या धामणगाव धाड येथे आज, १६ ऑक्‍टोबरला ही दुर्दैवी घटना घडली अन्‌ गाव परिसरात एकच खळबळ उडाली.

धामणगाव धाड येथील सुमनबाई रमेश शिनकर (४५) ही महिला आज पहाटे पाचच्‍या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर गेली. मात्र वेळेत परत न आल्याने सिनकर कुटुंबाने त्यांचा शोधाशोध सुरू केला. चिंचीवाल्या मळ्यातील आपल्या मालकीच्या गट नंबर २४० मधील शेतातील विहिरीची मोटार सुरू करण्यासाठी शेतकरी अनिल सपकाळ गेले असता त्यांना विहिरीजवळ चप्पल व बॅटरी आढळली. त्यांना संशय गेल्याने त्यांनी फोनद्वारे गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी विहिरीजवळ गर्दी केली.

पोलीस पाटील सविता पवार यांनी घटनेची माहिती धाड पोलिसांना दिली. महिलेचा मृतदेह विहिरीत मिळून आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह धाड येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविला. धाड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे. तपास धाड ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय सुरेश मोरे, पोलीस नायक भास्कर लवंगे, पो.काँ. राजू माळी, पो.ना. युवराज मुळे करत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.