पहुरजिरा येथे गावगुंड ‘सैराट’… अल्पवयीन मुलीची छेड काढली, जाब विचारणाऱ्या पती-पत्‍नीला शिविगाळ, मारहाण

जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पहुरजिरा (ता. शेगाव) येथे गावगुंडांनी अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर तिला चिडवले. एवढेच नव्हे तर त्यांना जाब विचारण्यास आलेल्या मुलीच्या पालकांनीही शिविगाळ करून मारहाण केली. जलंब पोलिसांनी या प्रकरणी 3 युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धोंड्या (18), देविदास श्रीकृष्ण वाशीमकर, गणेश खारोळे (सर्व रा. पहुरजिरा) अशी या गावगुंडांची नावे आहेत. धोंड्याने …
 

जलंब (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पहुरजिरा (ता. शेगाव) येथे गावगुंडांनी अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानंतर तिला चिडवले. एवढेच नव्‍हे तर त्‍यांना जाब विचारण्यास आलेल्या मुलीच्‍या पालकांनीही शिविगाळ करून मारहाण केली. जलंब पोलिसांनी या प्रकरणी 3 युवकांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

धोंड्या (18), देविदास श्रीकृष्ण वाशीमकर, गणेश खारोळे (सर्व रा. पहुरजिरा) अशी या गावगुंडांची नावे आहेत. धोंड्याने पाठलाग करत पीडित मुलीची छेड काढली. देविदासने तिला धोंड्याची बायको म्‍हणून चिडवले. या मुलीची आई त्‍यांना जाब विचारण्यास गेली असता तिला शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्‍या वडिलांना पोटात लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्रकरणी मुलीच्‍या आईने जलंब पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी तिन्‍ही युवकांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.