पाचच दिवसांत जिल्ह्यातून ३ मुलींचे अपहरण!, खामगाव, जळगाव जामाेद आणि आता नांदुऱ्यातून शाळकरी मुलीला पळवले

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १४ वर्षे १० महिने वयाची शाळकरी मुलगी शाळेत जाते सांगून घराबाहेर पडली, ती नंतर परतलीच नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तिला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. गेल्या ५ दिवसांत जिल्ह्यातील हे तिसरे अपहरण असून, यापूर्वी पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथून अकरावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी, खामगावातून १५ …
 
पाचच दिवसांत जिल्ह्यातून ३ मुलींचे अपहरण!, खामगाव, जळगाव जामाेद आणि आता नांदुऱ्यातून शाळकरी मुलीला पळवले

नांदुरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः १४ वर्षे १० महिने वयाची शाळकरी मुलगी शाळेत जाते सांगून घराबाहेर पडली, ती नंतर परतलीच नाही. त्‍यामुळे तिच्‍या वडिलांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तिला कुणीतरी पळवून नेल्याची तक्रार दिली आहे. गेल्या ५ दिवसांत जिल्ह्यातील हे तिसरे अपहरण असून, यापूर्वी पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) येथून अकरावीत शिकणारी अल्पवयीन मुलगी, खामगावातून १५ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण झाले आहे.

खेडगाव जुने (ता. नांदुरा) येथील ४५ वर्षीय व्‍यक्‍तीने तक्रार दिली, की त्‍यांना तीन मुली असून, तिसऱ्या क्रमांकाची मुलगी सावरगाव नेहू येथील शाळेत दहावीत शिकते. काल, १० ऑगस्‍टला सकाळी ते पत्‍नीसह शेतात कामासाठी निघून गेले. मधल्‍या मुलीने सांगितले, की लहान बहीण सकाळी साडेआठला शाळेत जाते सांगून गेली. ती अजून परतलेली नाही.

त्‍यामुळे पुतण्यासह तिच्‍या वडिलांनी तिचा शोध सुरू केला. शाळेत जाऊन विचारपूस केली असता तेथील शिक्षकांनी मुलगी सकाळपासून शाळेत आली नाही असे सांगितले. गावात व नातेवाइकांकडे फोनव्दारे सगळीकडे तिची विचारपूस केली. मात्र ती मिळून आली नाही. त्‍यामुळे तिला पळवल्‍याचा संशय तक्रारीत व्‍यक्‍त करण्यात आला आहे. पोलिसांनी तिचा शोध सुरू केला आहे.